तळोदा येथे ‘५० खोके महागाई एकदम ओके’ चे टी शर्ट घालून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

तळोदा येथे ‘५० खोके महागाई एकदम ओके’ चे टी शर्ट घालून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (Nationalist Youth Congress) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayantrao Patil) यांच्या आदेशानुसारमहागाई विरोधात आज तळोदा (taloda) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्मारक चौकात केंद्र सरकारविरोधात ‘५० खोके महागाई एकदम ओके’ चे टी शर्ट घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उदेसिंग पाडवी यांनी देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर (Central Govt) निशाणा साधला.

तळोदा येथे ‘५० खोके महागाई एकदम ओके’ चे टी शर्ट घालून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
Video नंदुरबार : मानाच्या श्री दादा व श्री बाबा गणपतींची स्थापना, जल्लोषात झाले आगमन

तळोदा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी, महागाई कश्यासाठी आमदारांच्या खरेदीसाठी, बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी उदेसिंग पाडवी म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये देशात बेरोजगारी वाढली आहे. डॉलरच्या मानाने रूपयाची किंमत फारच कमी झाली आहे. आणि त्यामुळे महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आजची परिस्थिती अशी आहे की रिझर्व्ह बँकेला सुद्धा महागाई कशी रोखता येईल यासाठी अनेक उपाय करावे लागत आहे. मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून लोन मागण्याचा प्रयत्न केला परंतु बँकेचे गव्हर्नर यांनी लोन देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर दडपण आणून त्यांना राजीनामा देण्यास सरकारने भाग पाडले.

देशभरात वाढलेल्या या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला घर चालवणं फार कठीण जात आहे. सरकारची तिजोरी भरण्यासाठी किराणा सामानावर देखील जीएसटी लावण्यात आला आहे, याचाही राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

या आंदोलनात युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, शहराध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, युवा नेते संदीप परदेशी, शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, नदीम बागवान, खजिनदार धर्मराज पवार, अल्संख्यांक शहरध्यक्ष आदिल शेख,

संघटक राहुल पाडवी, सहसंघटक मुकेश पाडवी, युवक तालुका उपाध्यक्ष दीपक वळवी, युवक तालुका उपाध्यक्ष संदीप वळवी, युवा कार्यकर्ता कुणाल पाडवी, मच्छिन्द्र पाडवी, निलेश मराठे, हितेश राणे, इमरान् शिकलीकर, नितीन मिस्त्री, असिफ शेख, हर्षल सूर्यवंशी,

मन्नू मणियार, प्रकाश पाडवी, सागर पाडवी, अरुण पाडवी, हिमांशू माळी, पवन सागर, भुर्‍या चित्ते, कुशन वळवी, रमेश पाडवी, रवींद्र वळवी, विश्वनाथ वळवी यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com