स्वच्छ सर्वेक्षणात नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कुल प्रथम

स्वच्छ सर्वेक्षणात नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कुल प्रथम

नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) अंतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात (clean survey) येथील श्रॉफ हायस्कूलने (Shroff High School) विविध निकष पूर्ण करून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

नंदुरबार नगर परिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ नुकतेच राबविण्यात आले. कचरा विलगीकरण, शौचालय सुविधा, पाण्याची उपलब्धता आदी निकष पूर्ण करणार्‍या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षण अंतर्गत श्रॉफ हायस्कूलने सर्वच पात्रता पूर्ण केल्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान प्राप्त केला. नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, आरोग्य सभापती श्रीमती मेहरून्निसा मेमन,

मुख्याधिकारी अमोल बागुल आदींच्या माध्यमातून हा उपक्रम शहरभर राबविला गेला होता. नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांच्या दालनात प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शहा, मनीष शाह, जयेश वाणी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com