श्री दादा गणपती मंडळाने दिला हा इशारा : तर..श्री विसर्जन करणार नाही

श्री दादा गणपती मंडळाने दिला हा इशारा : तर..श्री विसर्जन करणार नाही

नवापूर Navapur । श.प्र.-

येथील सराफ गल्ली, दादा गणपती मंडळ (Shri Dada Ganapati Mandal) परिसरातील रस्ता दुरुस्ती (road repair) श्री गणेशाच्या स्थापनेपुर्वी करण्यात यावी, अन्यथा गणेशाचे विसर्जन (Immersion of Ganesha) न करण्याचा इशारा (warning) श्री दादा गणपती मंडळाने दिला आहे.

मंडळाच्या पदधिकार्‍यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी, मुख्यधिकारी सप्नील मुधलवाडकर, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, सन 2022 मानाचा दादा गणपतीमंडळाचा 50 वा वर्धापन दिवस सुवर्ण महोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

सदर मंडळाचापरिसर हा मेनरोड जामा मस्जिद ते राकेश राणा यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या रस्त्याची अत्यंतदयनीय अवस्था आहे. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी सदर रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदने दिले आहेत, आंदोलनाचा ईशारादेखील दिला आहे. नगरपरिषद कार्यालयाकडून आजतागायत डागडूजी करुन वेळ काढण्याचा प्रयत्न केला गेलाआहे.

परंतु, पावसाचे वातावरण पाहता कामचलाऊ दुरुस्ती दोन दिवसांत जैसे थे परिस्थितीनिर्माण होत आहे. नागरिकांना वाहन व पायी चालण्यास सुध्दा जिकीरीचे होत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यात यावा. दि.31 ऑगस्ट रोजी श्री. गणेशाच्या स्थापनेपुर्वी या परिसरातील रस्त्याचे दुरुस्तीकरण न झाल्यास मंडळाने गणपती विसर्जन न करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी ही नवापूरनगरपरिषदेची राहील.असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विराज शहा, दर्शन पाटील, अजय पाटील, धमेंद्र पाटील, प्रशांत पाटील, प्रेमेंद्र पाटील, दर्पण पाटील, भरत सोनार, भिकन पाटील, हरीष सोनार, शैलेंद्र पाटील, अल्पेश पाटील, उमेश पाटील, छोटु पाटील, कृष्णा पाटील सह श्री दादा गणपती मंडळाचे पदधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com