crime news
crime news

धक्कादायक : १६ वर्षीय मुलीला साडे तीन लाखात विकले

लग्न लावून वेळोवेळी बलात्कार, सहा जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

तेलखेडीचा अठ्ठारीपाडा (ता.धडगाव) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नासाठी ३ लाख ६० रुपयामध्ये विक्री करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा अठ्ठारीपाडा येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ७ मार्च २०२२ रोजी संदिप सुकलाल पावरा व संगीता संदिप पावरा यांनी पाहुणी म्हणुन घरी घेऊन जातो असे सांगुन टेंभुर्णी ता.म्हाढा जि.सोलापूर येथे पळवून नेले.

सुक्रिया महाडीक याच्या मध्यस्थीने सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद यास ३ लाख ६० रुपयामध्ये पिडीत युवतीची विक्री केली. त्याने संशयित आरोपींच्या उपस्थितीत लग्न केले. गोविंद याने लग्न करुन त्याच्या घरात वेळोवेळी अल्पवयीन पिडीताचे इच्छेविरुध्द जबरीने शारीरीक संबंध केले.

याबाबत पिडीत मुलीच्या नातलगांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुक्रिया महाडीक (रा.टेंभुर्णी ता.म्हाढा, जि. सोलापूर), सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद (रा.आलेगाव ता. म्हाढा, जि.सोलापूर), संदिप सुकलाल पावरा, संगीता संदिप पावरा (रा.राडीकलम, धडगाव), गोविंदची आई व गोविंदची वडील (दोन्ही रा.आलेगाव, ता.म्हाढा, जि.सोलापूर)

यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२), (एन) ३६६ (अ), ३७२, ३७३ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२ चे क ५ (एल) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई डी.के.महाजन करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com