देहली प्रकल्पाचा वाद पेटला ; शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलनचा इशारा

देहली प्रकल्पाचा वाद पेटला ; शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलनचा इशारा

खापर l वार्ताहर Akkalkuwa

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण अश्या देहली प्रकल्पाचे (Dehli project) काम नुकतेच सुरु झाले होते मात्र (Lok Sangharsh Morcha) लोक संघर्ष मोर्चाने प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांच्या बहाण्याने ते काम पुन्हा बंद पाडण्यात आले आहे.

देहली प्रकल्पाचा वाद पेटला ; शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलनचा इशारा
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पण...

सदर काम त्वरित सुरु करण्यात यावे यासाठी (shivsena) शिवसेने तर्फे (Tehsildar) तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देण्यात आले आहे. जऱ दोन दिवसात काम सुरु झाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी निवेदना द्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कालावधीत अनेक आंदोलन आणि पाठपुरावा करुन देहली मध्यम प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली होती यावर्षी पाणी रोखले जाईल अशी अपेक्षा असताना अगोदरच पिढ्यान पिढ्याचे नुकसान झालेले असताना प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांच्या बाहण्यावरुन लोक संघर्ष मोर्चा तर्फे पुन्हा काम बंद करण्यात आल्याचे समजते आहे, प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या जवळ जवळ मिटल्या असताना काम बंद पाडण्याचा हेतु योग्य नाही.

देहली प्रकल्पाचा वाद पेटला ; शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलनचा इशारा
भयंकर! भरधाव ट्रकने तीन वाहनांना ठोकरले, दोन जण जागीच ठार

जरी प्रकल्प ग्रस्तांच्या काही अडचणी अजूनही शिल्लक असतील तर लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्यांनी शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा किवा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ॲड के.सी.पाडवी यांनी 15 दिवसात सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचे शब्द दिलेला होता त्यांच्याकडे लोक संघर्ष मोर्चाचे नेत्यांनी संपर्क करावा सद्या कामाची अर्धवट स्थिति आहे त्या स्थितीत जऱ नदिला पुर आला तर आहे ते बांधकाम 100 टक्के वाहून जाईल आणि त्याच्यामुळे परिसराला प्रचंड धोका निर्माण होऊन गावेच्या गावे वाहून जाण्याची शक्यता आहे तसे झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार धरणाचे काम बंद पडणारे लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी राहतील.

आज पर्यंत लोक संघर्ष मोर्चाच्या पदाधिका-यांनीच अनेक अडचणी सदर प्रकल्पासाठी आणल्या आहेत तरी अश्या लोकां विरुद्ध शासनाने गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी.

तसेच धरणाचे काम दोन दिवसात पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना संबधित विभाग व ठेकेदारास देण्यात याव्यात दोन दिवसात सदर गुन्हा दाखल करुन व काम सुरू झाले नाही तर शिवसेनेतर्फे 1 में रोजी खापर येथील कोराई चौफुलीवर रास्ता आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना (nandurbar) नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, माजी सरपंच संपत वसावे, प.स.सदस्य जेका पाडवी, कोराई माजी सरपंच टेडग्या वसावे, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाडवी, सोनापाटी सरपंच कुवरसिंग पाडवी, में.अंकुशविहिर सरपंच सरलाबाई पाडवी, सोरापाडा सरपंच छोटूलाल पाडवी, खापर माजी सरपंच जोलु वळवी, भीमसिंग तडवी, कैलास वसावे, में.अंकुशविहिर उपसरपंच रतनसिंग वसावे, राजू तडवी, ग्रा.प.सदस्य रोहिदास तडवी, सुरुपसिंग वसावे, गोलू चंदेल, अक्षय सोनार, जसराज पवार आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.