राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रश्न सोडविण्यात अपयशी - कुणाल राऊत

21 मार्चला विधानभवनावर मोर्चा
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रश्न सोडविण्यात अपयशी - कुणाल राऊत

शहादा Shahada । ता.प्र.-

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) शेतकरी, आदिवासी, दलित सर्व वर्गातील प्रश्न (problem) सोडवण्यात अपयशी ठरले आहे. तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसून सरकार राजकारण करण्यात आणि यंत्रणांचा गैरवापर करण्यात व्यस्त आहे. युवकांना रोजगार मिळेल असे एकही धोरण बनवले नाही. शासनाचा पैसा ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी खर्च केला जात असल्याचा आरोप करत तरुणांच्या प्रश्नांकडे आणि शेतकरी, काबाडकष्ट करणार्‍या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी 21 मार्चला शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या विधानभवनावर भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चास उपस्थित राहावे असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Youth Congress State President Kunal Raut) यांनी केले.

येथील बायपास रस्त्यावरील केशरानंद मॅरेज लॉनमध्ये जिल्हा युवक काँग्रेस तर्फे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत बोलत होते. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात 21 मार्चला मुंबई येथील विधान भवनावर राज्य भरातील युवक कार्यकर्ते एल्गार करणार आहेत. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष श्री राऊत राज्याच्या दौर्‍यावर असून त्यांच्या नेतृत्वात शहादा येथे भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश ओगले, जिल्हा प्रभारी किरण पाटील, प्रवक्ता दिपक राठोड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव तुषार गोसावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश पाटील, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मकसूद खाटीक, माजी नगरसेवक रियाज कुरेशी ,डॉक्टर योगेश पावरा, ओरसिंग पटले, दिनेश पवार, प्रकाश पवार, आदींसह विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रश्न सोडविण्यात अपयशी - कुणाल राऊत
वादळात झाडाची फांदी अंगावर पडल्याने तरुण ठार

यावेळी श्री.राऊत म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारच्या काळात वाढती महागाई, बेरोजगारी, महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या समस्यांसह जुनी पेन्शन, आदिवासी बांधवांचे विविध मुद्दे घेऊन विधानभावनावर घेराव करण्यात येणार आहे. त्यासाठी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन विष्णू जोंधळे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com