नंदुरबारची शिफा पाडवी मलेशिया रॅम्प वॉक करणार

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व
नंदुरबारची शिफा पाडवी मलेशिया रॅम्प वॉक करणार

नंदुरबारNandurbar । प्रतिनिधी

शहरातील शिफा पाडवी (Shifa Padvi) ही मलेशिया (Malaysia) येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय मिस पेटीट ग्लोबलमध्ये (International Miss Petit Global) सहभाग घेवून रॅम्प वॉक (Ramp walk) करणार आहे. 18 देशातील तरुणी यात सहभागी होणार आहेत. शिफा ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर शहरातील शिफा पाडवी या मिशन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (Mission English Medium School) दहावीत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनीने लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर (international level) भारताचे प्रतिनिधित्व (Representation of India) करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करणार आहे. मलेशियामधील कोचीन शहरात 2 मे रोजी 2022 होणार्‍या मिस पेटीट ग्लोबलमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याठिकाणी 18 हून अधिक देश सहभागी होणार आहेत.

नुकतेच पुणे येथे दोन ऑडिशन (Audition) फेर्‍या पार केल्यानंतर आणि 23 उमेदवारांशी स्पर्धा केल्यानंतर शिफा पाडवीची या स्पर्धेसाठी निवड (Selection) झाली. तिला तिचे गुरू कासिम सय्यद यांनी मार्गदर्शन केले. मिस पेटीट ग्लोबलचे नॅशनल डायरेक्टर गौरव सिंग आणि प्रियांका मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिस शिफा जागतिक फायनलसाठी स्वत:ला तयार करणार आहे.

मिस पेटीट ग्लोबलमध्ये प्रतिनिधी असण्यासोबतच, शिफा आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (International competition) मिस ग्लॅमर लूक इंडियामध्येही (Miss Glamor Luke Indium) भाग घेणार आहे. शिफा यापूर्वी मिस महाराष्ट्र तसेच मिस युनिव्हर्स (Miss Universe) या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळविले आहे. यासाठी आई दीपमाला पाडवी, वडील गौरव पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एस.ए.एम.संस्था तसेच पुनम पाडवी, प्रगती पाटील, मनोज तांबोळी यांनी सहकार्य केले.

मान्यवरांकडून सत्कार

शिफा पाडवी हिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालेल्या निवडीबद्दल तिचा सत्कार खा डॉ हिना गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे, मिशन इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत मुख्याध्यापिका सुनिता अहिरे यांनी सत्कार केला.

Related Stories

No stories found.