पोलीस संरक्षणात शहादा-धडगाव बस निघाली.. पण

पोलीस संरक्षणात शहादा-धडगाव बस निघाली.. पण

शहादा Shahada । ता.प्र. -

गेल्या 16 दिवसांपासून राज्यात एस . टी . कर्मचार्‍यांचा संप (S. T. Employees strike) सुरू असताना शहादा आगारातून (Shahada Depot) धडगावसाठी (Dhadgaon) पोलिसांच्या संरक्षणात (police protection) पाच प्रवाशांसह (five passengers) पहिली बस (first bus) रवाना करण्यात आली. मात्र, काकडदा (ता.धडगाव) गावाजवळ अचानक बस चालवत असताना चालकाला (driver) हृदय विकाराचा त्रास (suffered a heart attack) होवू लागल्याने त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसवाहक व प्रवाशांनी चालकास रुग्णालयात (hospital) दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, राज्यात गेल्या16 दिवसांपासून एस.टी. कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.त्यामुळे एक ही बस आगाराच्या बाहेर पडली नाही, (ता.19) सकाळी साडेअकरा वाजता शहादा बसस्थानकातून शहादा धडगाव ही बस (क्र.एमएच 20 बीएल 0916) शहादा पोलिसांच्या संरक्षणात चालक अशोक कोळी व वाहक रवींद्र शिरसाठ बसमध्ये पाच प्रवासी घेऊन धडगावसाठी रवाना झाले होते. या बसला शहादा पोलिसांनी म्हसावदपर्यंत संरक्षण दिले. तेथून पुढे म्हसावद पोलिसांनी फत्तेपूरपर्यंत संरक्षण दिले होते. त्यानंतर ही बस प्रवाशांना घेऊन धडगावकडे रवाना झाली. मात्र रस्त्यातच अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील काकडदा गावाजवळ चालक अशोक कोळी यांना छातीत कळा आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना त्यांना होणार्‍या त्रासाची जाणीव करून दिली. त्यांनी तत्काळ काकडदा रुग्णालयात त्यांना प्राथमिक उपचारासाठी दाखल करीत शहादा येथील एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी आगारप्रमुख वाय. एस. लिंगायत यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत श्री.कोळी यांना शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेवरून संप सोडून पुन्हा सेवेत हजर होणार्‍या कर्मचार्‍यांची मानसिकता स्थिर नसल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संपात सामील न होणार्‍या कर्मचार्‍यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्या कर्मचार्‍यांची मानसिकता खचल्याने कालच्या घटनेवरून दिसून आल्याचे बोलले जात आहे.संपकरी कर्मचार्‍यांमध्ये अशोक कोळी हे कालपर्यंत सहभागी होते. मात्र पन्नाशीच्या वर वय असल्याने नोकरी जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी संपातून माघार घेत कामावर येण्याचा निर्णय घेतला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com