सात एकर अफूची शेती केली उध्वस्त

सात एकर अफूची शेती केली उध्वस्त

शहादा - Shahada - ता.प्र :

शहादा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिरूड तर्फे हवेली शिवारात सुमारे सात एकर अफूची शेती पोलिसांनी धाड टाकून उध्वस्त केली.

याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.अफूच्या शेतीतून 70 मजुरांकडून अफूची झाडे कापण्याचे काम सुरु असून उद्यापर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचे मोजमाप करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

अफूची शेती करणार्‍या शेतकर्‍याने नामी शक्कल लढवून शेतात आजूबाजूला मका तर आतमध्ये अफूची लागवड केल्याचे दिसून आले.

अफूचे पीक पूर्ण तयार झाल्याचे आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले.याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ही शेती स्थानिक शेतकरी असलेल्या काका - पुतण्याच्या नावावर असून त्यांच्याकडून गावात गेल्या काही महिन्यांपासून बाहेरून येवुन वस्ती करून वसलेल्या मेंढपाळ लोकांनी ही शेती एकरी रुपये 25 हजार प्रमाणे चार महिण्यांसाठी भाडे कराराने घेतली आहे. या मागे असलेले रॅकेट याचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com