गोरंबा ग्रामपंचायतींमधील पाड्यांवर तीव्र पाणी टंचाई

गढूळ, दूषित पाणी पिऊन नागरिक भागवताहेत तहान
गोरंबा ग्रामपंचायतींमधील पाड्यांवर तीव्र पाणी टंचाई

नंदुरबार ।Nandurbar । प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील गोरंबा ग्रामपंचायत (Goramba gram panchayats) मधील लहान गावठाण पाडा, मोठे गावठाणपाडा, मोवडाबीपाडात राहणार्‍या नागरिकांना (citizens) तीव्र पाणीटंचाईचा (Acute water scarcity) सामना करावा लागत आहे.

या परिसरात जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना नैसर्गिक झर्‍यावर (natural spring) अवलंबून राहावे लागते. धडगाव तालुक्यातील गोरंबा ग्रामपंचायत मधील जवळपास तीन हजार पेक्षा अधिक नागरिक असलेल्या या पाड्यांवर मे महिन्याच्या अखेरीस देखील प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा (Drinking water facility) करण्यात आलेली नसून नागरिकांना डोंगरदर्‍यात (mountains) असलेल्या नैसर्गिक झर्‍यातून आपली तहान भागवण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस नैसर्गिक झरे आटत आली असल्याने गढूळ दूषित पाणी पिऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.गोरंबा गावात गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.

ग्रामपंचायतींच्या (Goramba gram panchayats) माध्यमातून नळपाणी योजना (Tap water scheme) आखण्यात आली मात्र कागदावरच राहिली. हातपंपाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र योग्य ठिकाणी नसल्याने पाण्याअभावी आटले आहे. जवळपासचे नदी, नाले, विहिरी सर्व कोरड्या पडल्या असून गोरंबा ग्रामपंचायत मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी (water) जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

ग्रामपंचायत मधील सरपंच, सदस्य तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने गोरंबा ग्रामपंचायत मधील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी सुरेश राहसे, दिलीप तडवी,दीना वळवी यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com