
प्रकाशा Prakasa| वार्ताहर -
येथील एका सराफाच्या दुकानातून (bullion In the shop) दोन महिलांनी (women) काऊंटरवरील गल्ल्यात हात घालून ७ लाखांचे दागिने (Jewelry) असलेला डबा लंपास केला आहे. या चोरीची घटना सीसीटीव्ही (cctv) मध्ये कैद झाली आहे. दुकानाबाहेर दोन तरुण देखील उभे असल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. याबाबत पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि. २० मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोनार गल्लीतील परिणीता ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात एक महिला व मुलगी आली. त्यांच्यासोबत आलेले दोन तरुण दुकानाबाहेर उभे होते. सकाळी दुकानातील नोकर वर्ग सफाई करत होते.
मालक बाळू सोनार व अश्विन सोनार हे घरात काम करत होते. त्या संधीचा फायदा घेत नोकरांची दिशाभूल करून दोन्ही महिलांनी काऊंटरवरील (counter) गल्ल्यात हात घालून प्लास्टिक डबा चोरून (Stealing the box) नेला. या डब्यात सोन्याची नथ, पेंडल असे सुमारे ७ लाखांचे ७५ ग्राम सोने होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले. तसेच श्वान पथकालाही (Dog squad) पाचारण करण्यात आले होते . रात्री उशिरापर्यंत पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत प्रकाशा येथे तळ ठोकून होते.