चौघांच्या शेतातून गांजाची झाडे जप्त

धडगांव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा
चौघांच्या शेतातून गांजाची झाडे जप्त

धडगांव | प्रतिनिधी- nandurbar

धडगांव तालुक्यातील उमराणीचा बारीपाडा शिवारात पोलीसांनी धाड टाकुन ४ जणांच्या शेतात लागवड केलेली ७ लाख ५१ हजार ४४० रूपये किंमतीचे ३ क्विंटल ७५ किलो ७२० ग्रॅम वजनाचे एकुण १ हजार २३ गांजाची झाडे (cannabis plants) जप्त (seized) केली असुन याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.आर.औताडे यांना धडगाव तालुक्यात उमराणीचा बारीपाडा शिवारात २ ते ३ शेतांमध्ये गांजा हा अमली पदार्थाची बेकायदेशीरित्या लागवड केली असल्याची बातमी मिळाल्याने पथकाने त्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता,

सरदार शंकर पावरा , अनिल शंकर पावरा , भाईदास डोंगरसिंग पावरा , जयसिंग शंकर पावरा यांच्या शेतात ७ लाख ५१ हजार ४४० रूपये किंमतीचे ३ क्विंटल ७५ किलो ७२० ग्रॅम वजनाचे एकुण १०२३ गांजा पदार्थाचे झाडे जप्त (seized) लागवड केलेली दिसुन आली.पोलीसांनी ही झाडे जप्त केली असुन

सरदार शंकर पावरा , अनिल शंकर पावरा , भाईदास डोंगरसिंग पावरा , जयसिंग शंकर पावरा सर्व रा. उमराणीचा बारीपाडा ता.धडगांव यांच्या विरूध्द पोसई राहुन शालीग्राम भदाणे यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात एन . डी . पी . एस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राहुल भदाणे , हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव , जयेश गावीत , पोना शशिकांत वसईकर , पोकॉ हिरालाल सोनवणे , रितेश बेलेकर, विनोद पाटील , राजेंद्र चोरमले , गणेश मराठे , स्वप्निल गोसावी , दिपक वारुळे , अशोक पाडवी यांच्या पथकाने केली .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com