श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची संवेदनशीलता

दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या उपचारासाठी दिले ४९ हजार रुपये
श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची संवेदनशीलता

नंदुरबार |NANDURBAR | प्रतिनिधी

संवेदनशीलता व सहकार्यवृत्ती या संस्कारी मूल्यांना (cultural values) विद्यार्थ्यांच्या(students) मनामध्ये रुजवणे (Rooted in the mind) काळाची गरज झाली आहे. याच मानवी मूल्यांची जोपासना विद्यार्थी करीत असल्याचा सुंदर प्रत्यय श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांबाबत आला. आपल्यासोबत शिक्षण घेत वावरणार्‍या एका विद्यार्थिनीला (student) यकृताच्या (the liver) जीवघेण्या आजाराचा सामना (life-threatening illness) करावा लागत असताना तिच्या सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या पालकांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या खारीच्या वाट्यातून सुमारे ४९ हजार रुपये (About 49 thousand rupees) अवघ्या दोन दिवसात गोळा (collecting) करून कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली कु.हेतल कैलास कुंभार या विद्यार्थिनीची प्रकृती दहा दिवसांपूर्वी बिघडली. नंदुरबार येथील विविध रुग्णालयांमध्ये तिच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर प्रकृती अधिकच खालावू लागली म्हणून तिला तातडीने धुळे येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

तेथे तिला यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. या उपचारासाठी महागडी औषधे व इतर वैद्यकीय सुविधांसाठी पालकांनी जवळ हवी तशी आर्थिक उपलब्धता नव्हती. आपल्या सोबत शिकणारी मैत्रीण अत्यवस्थ झाली आहे म्हणून तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा निरोप कु.पायल राजपूत व कु.अक्षिता बेडसे या विद्यार्थिनींनी तिचे वर्गशिक्षक राजेंद्र मराठे यांना दिला.

शाळेच्या मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह यांना विषयाची गंभीरता कळल्यानंतर तत्काळ गरजूला उपचारासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या खारीच्या वाट्यातून आर्थिक मदतीचे आवाहन केले गेले. याचा दृश्य परिणाम बघावयास मिळाला. या दोन दिवसात ४९ हजार रुपये उपचार मदत निधी विद्यार्थी व शिक्षकांनी उपलब्ध करून दिली.

आपल्या सोबत शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी लवकर सुखरूप उपचार घेऊन घरी यावी यासाठी दयाशील सौजन्यशील वृत्ती विद्यार्थ्यांनी दाखवून दिली. सदर कु.हेतल कैलाश कुंभार हिची आजी व काका यांना ४९ हजार रुपये धनादेशाद्वारे मुख्याध्यापक सौ सौ.सुषमा शाह यांनी प्रदान केले.

यावेळेस उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका सौ. विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील उपस्थित होते. हा उपक्रम राबविण्यासाठी राजेंद्र मराठे, केशव राजभोज, राहुल वडनेरे, वैभव पाटील, गिरीष चव्हाण यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com