नंदुरबार पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड बिनविरोध

सभापतीपदी अमित रघुवंशी, मंगलाबाई माळी, राकेश हासानी, मेहरुन्नीसा मेमन, कैलास पाटील यांची निवड
नंदुरबार पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड बिनविरोध

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील पालकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बांधकाम सभापतीपदी अमित रघुवंशी, शिक्षण समिती सभापतीपदी राकेश हासानी, स्वच्छता,वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापतीपदी मेहरुन्नीसा मेमन, पाणीपुरवठा सभापतीपदी कैलास पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी मंगलाबाई माळी, नियोजन आणि विकास समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नंदुरबार पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड बिनविरोध
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नंदुरबार नगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीची निवड आज पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सर्व विषय समित्यांची बिनिविरोध निवड करण्यात आली.

विविध विषय समिती सभापती व सदस्य असे-

बांधकाम समिती - सभापती-अमित रघुवंशी, सदस्य-रवींद्र पवार, नंदा जाधव, सोनिया राजपूत, दीपक दिघे, जागृती सोनार, भावनाबाई गुरव, आनंदा माळी, आकाश चौधरी, गौरव चौधरी.

शिक्षण समिती - सभापती - राकेश दिलीपकुमार हासानी, सदस्य- आशा बालानी, मनिषा वळवी, सुरेखा मराठे, प्रमोद शेवाळे, गजेंद्र शिंपी, भावनाबाई गुरव, रेखा चौधरी, कल्पनाबाई चौधरी, ज्योती राजपूत.

स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती- सभापती- मेमन मेहरुन्निसा गणी, सदस्य- ज्योती पाटील, कुरेशी फहमीदाबानो रियाज, भारती राजपूत, मनीषा वळवी, जगन्नाथ माळी, भावनाबाई गुरव, सिंधुबाई माळी, गौरव चौधरी, निलेश पाडवी.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती - सभापती- कैलास पाटील, सदस्य-रवींद्र पवार, किरण रघुवंशी, दीपक दिघे, कुरेशी फहमीदाबानो रियाज, भारती राजपूत, शोभाबाई मोरे, सिंधूबाई माळी, संगीता वसईकर, निलेश पाडवी.

नियोजन व विकास समिती - सभापती- कुणाल वसावे, सदस्य-किरण रघुवंशी, प्रमोद शेवाळे, कसाई रोशन मेहबूब, शेख इम्रान गुलाम रसूल, आरिफसाब कमरसाब शेख, हर्षा बाफना.

महिला व बालकल्याण समिती - सभापती- मंगलाबाई महादू माळी, सदस्य- ज्योती पाटील, मनिषा वळवी, सुरेखा मराठे, सोनिया राजपूत, शारदाबाई ढंढोरे, हर्षा बाफना, संगीता वसईकर, संगीता सोनवणे, ज्योती राजपूत.

स्थायी समिती - सभापती -नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी, सदस्य- कुणाल वसावे, अमित रघुवंशी, राकेश हासानी, मेमन मेहरूनिस्सा गणी, कैलास पाटील, मंगलाबाई माळी, परवेज खान, यशवर्धन रघुवंशी, प्रशांत चौधरी.

नंदुरबार पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड बिनविरोध
इस्रोला मिळाले नवीन प्रमुख, जाणून घ्या कोण आहेत एस.सोमनाथ

Related Stories

No stories found.