
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
पावसाळा सुरु झाला असला तरी अद्याप नंदुरबार जिल्हयात समाधानकारक (rain) पाऊस पडलेला नाही. दररोज पांढर्या काळया ढगांचा ऊन सावलीचा खेळ आकाशात पहायला मिळतो. पाऊस बरसत नसला तरी आकाशात काळया, पांढर्या ढगांमुळे तसेच मावळतीला आलेल्या सूर्याच्या तिरसक किरणांमुळे दररोज सायंकाळच्या सुमारास नयनरम्य अशा रंगीबिरंगी छटा पहायला मिळत आहेत. या रंगीबिरंगी छटा पाहण्याचा आनंदच काही निराळा आहे. सायंकाळच्या सुमारास दररोज हा नजारा पहायला मिळत असल्याने वातावरणही आल्हाददायक बनत आहे.