सती गोदावरी विद्यालयाचे ‘आदिवासी होळी’ लोकनृत्य विभागीय स्तरावर प्रथम

सती गोदावरी विद्यालयाचे ‘आदिवासी होळी’ लोकनृत्य विभागीय स्तरावर प्रथम

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे युवा महोत्सव उत्साहात

म्हसावद । Mhasavad । वार्ताहर

जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय नंदुरबार (District Sports Officer's Office Nandurbar) आयोजित युवा महोत्सवात (Youth Festival) लोकनृत्य कलाप्रकारात प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयाने (Sati Godavari Vidyalaya') ग्रामीण भागातील आदिवासी होळी (Adivasi Holi) हे लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शाळेने जिल्हा स्तरावर खान्देशातील गोंधळीनृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला होता तर विभागीय स्तरावर ग्रामीण भागातील आदिवासी होळी हे लोकनृत्य ऑनलाईन शाळेच्या प्राचार्या सुरेखा गुजर यांच्या ऊपस्थितीत सादर करण्यात आले.यात शाळेने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून येत्या 7 जानेवारी रोजी होणा-या राज्य स्तरासाठी निवड झाली आहे. शाळेच्या प्राचार्या श्रीमती सुरेखा गुजर यांच्या बहूमुल्य मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थीनी व मार्गदर्शक शिक्षक कल्पना अहिरे ,ज्योती पवार, पुनम सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले तर सुधाकर पाटील,नितीन महिंद्रे यांनी सहकार्य केले.नाशिक विभाग क्रीडा उपसंचालक व नंदुरबार जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील,क्रीडामार्गदर्शक जगदीश चौधरी,क्रीडा कार्यालयातील मुकेश बारी यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन विठ्ठल हिरजी चौधरी,उपाध्यक्ष धारू सदाशिव पाटील,सचिव गणेश नरोत्तम पाटील यांचेसह संचालक मंडळाने यशस्वी संघाचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com