नवापूर येथील नगरसेवकांच्या निष्क्रीयतेमुळे सराफ गल्ली समस्यांच्या गर्तेत

काही प्रभाग चक्क दोन तीनवेळा रस्ते,संतप्त नागरीकांचे नगराध्यांना निवेदन, आंदोलनासह पालिका निवडणुकीवर बहिष्काराचा ईशारा
नवापूर येथील नगरसेवकांच्या निष्क्रीयतेमुळे सराफ गल्ली समस्यांच्या गर्तेत

नवापर । Navapur। श.प्र.

शहरातील सराफ गल्लीतील (Saraf galli) रस्त्यासाठी (road) 5 वर्षात निधी मंजुर (Funding approved) होऊ शकला नाही.तसेच विजेची सोय सुध्दा केली नाही. पाच वर्षाात काही प्रभागात चक्क दोन ते तीन वेळा नवीन रस्ते केले गेले. याबद्दल प्रभाग क्र 6 व 7 चा रहिवाशांनी(Residents) तहसिलदार (tehsildar) मंदार कुलकर्णी, नगराध्यक्षा (Mayor) हेमलता पाटील,पोलिस निरीक्षक (Inspector of Police) बाळासाहेब भापकर यांची भेट घेऊन निवेदन (Statement) देऊन संताप व आक्रोश व्यक्त केला. सराफ गल्लीतील रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन आंदोलनासह आगामी नगर पालिका निवडणुकीवर (municipal elections) बहिष्कार (Boycott) टाकण्याचा निर्णय सराफ गल्लीतील रहीवाशांनी निवेदनाद्वारे केला आहे.

नवापूर शहरातील सराफ गल्लीत रस्त्याची पार दुरावस्था झाली असुन प्रभागातील क्र 6 व 7 चा नगरसेवक या पाच वर्षात रस्त्या साठी निधी मंजुर करु शकले नाहीत.याबद्दल रहिवाशांनी आश्चर्य व संताप नगराध्यक्ष हेमलता पाटील यांच्या समोर व्यक्त केला.

यावेळी प्रभाग क्र 6 व 7 च्या नगरसेविका सुरेखा जगदाळे,महेंद्र दुसाने,प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार आदी उपस्थित होते.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,नवापूर शहरातील श्रीराम मंदीर जवळील रस्ता व शितल सोसायटी भागात रस्त्यांचे दोनदा डांबरीकरण केले गेले.मात्र प्रभाग 6 मधील रस्ता एकदा ही झाला नाही.

नवीन पथदिवे लावु शकले नाही.दोन वर्षापुर्वी डांबरीकरण व्हावे यासाठी सराफ गल्लीतील रहीवाशांनी आंदोलन केले होते. त्यावेळी रस्ता बनवुन देऊ असे आश्वासन नगरसेवकांनी दिले होते. मात्र 5 वर्ष पुर्ण होऊन गेले मात्र रस्ता तर सोडा साधी दुरुस्ती सुध्दा केली नाही.मात्र या उलट पाच वर्षात राममंदीर गल्लीतील रस्ता दुसर्यांदा तर शितल सोसायटीचा रस्ता तिसर्‍यांदा बनविण्यात येत आहे.सत्ताधार्‍यांमध्येच विकास कामाबाबत भेदभाव होत असल्याची चर्चा आहे.सराफ गल्लीसाठी प्रभाग 6 च्या नगरसेवकांना 5 वर्षात रस्त्यांसाठी निधी मंजुर करता आला नाही.

याबाबत परिसरात रहीवाशांनमध्ये तीव्र संताप व आक्रोश करत नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सराफ गल्लीतील रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन तो लवकरात लवकर करावा अन्यथा दि 15 ऑगस्टला ध्वजारोहन दिनाचा दिवशी सराफ गल्लीतील रहीवासी घंटानाद आंदोलन करणार आहेत. तरीही रस्ता नाही झाला तर 15 दिवसा नंतर नगरपालिके समोर बेमुदत आमरण उपोषण व आगामी नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सराफ गल्लीतील रहीवाशांनी निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनावर माजी नगरसेवक दर्शन पाटील,माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया,उमेश शहा,राकेश राणा,गोपाल मराठे, सुनिल पाटील,प्रेमेंद्र पाटील,दर्शन दिपक पाटील,अनिल पाटील,अतुल माळी,संजय पाटील,शैलेंद्र पाटील,भिकन पाटील,निलेश जोशी,भरत सोनार,हरीष सोनार,नैनेश पाटील,आनंद वशिष्ठ,गिरीष पाथरकर,सागर सोनार,डॉ विशाल पाटील,दिपु पाटील,गोपाल मराठे,इरफान मुल्ला,फैजल पठाण,आदीचा सह्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com