
नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
(maharashtra) राज्यातील अ आणि ब प्रवर्गातील महानगरपालिका (Municipal Corporation) वगळता क व ड महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद नगरपंचायत (Nagar Parishad, Nagar Panchayat) क्षेत्रातील कोविंड (corona) विरोधी मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडताना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना (Central government) केंद्र शासन व (State government) राज्य शासनाच्या धर्तीवर पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान वितरित करणे बाबतचा निर्णय नगर विकास विभागाचे शासन निर्णय प्र. क्र 243 दि.11 फेब्रुवारी 2022 अन्वये घेण्यात आला आहे.
अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, कंत्राटी मानधन तत्त्वावरील बाह्य स्रोत यांचासह यांचा समावेश करण्यात आला आहे 64. 50 कोटी रुपये सन 2021 2022 या आर्थिक वर्षाकरिता आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन (Municipal administration) संचालनालयाकडे वितरित करण्यात येत आहे. कोरोना योद्धाना विमा कवच देण्याची मागणी (Maharashtra State Government Employees) महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने केली होती.
तसेच महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेने कोरोनाने मयत झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना विमा कवच देण्याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात (Aurangabad High Court) याचिकेद्वारे करण्यात आला होती.
मृत कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती तातडीने द्या? मृत कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे 26 प्रलंबित अनुकंपा नियुक्त्या तातडीने द्याव्यात व नगरपरिषदा नगरपंचायती मध्ये पालिकेच्या आस्थापनेवरील नियुक्तीचे अधिकार (Collector) जिल्हाधिकार्यांना असून मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असून त्याही नियुक्त्या देणे बाबत (cm) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, (Minister for Urban Development) नगर विकास मंत्री, मुख्य सचिव, यांच्याकडे मध्यवर्ती महासंघाने लेखी निवेदना द्वारे केली आहे अशी माहिती कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली. सातत्याने शासनाशी पाठपुरावा करून कोरोना काळातील मयत अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे असे देखील राजपूत यांनी सांगितले.