शहादा पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

शहादा पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

शहादा । Shahada । ता.प्र.

माझी वसुंधरा अभियान (My Vasundhara Abhiyan) महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियान(नागरी) (Maharashtra State Sanitation Campaign) अंतर्गत स्वच्छता मोहीम (Sanitation campaign) व श्रमदान सुरवात नंदुरबार जिल्हा परिषदेचे (Nandurbar Zilla Parishad) माजी कृषी सभापती अभिजीत पाटील (Former Agriculture Chairman Abhijeet Patil) यांच्या उपस्थीतीत सुरूवात झाली आहे. यावेळी स्वच्छता अभियान सहभागी यांना स्वच्छता मोहीम शपथ देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियान शहादा नगरपालिका स्वच्छता विभाग, संकल्प गृप, पालिका प्रशासनातील सहल विभाग व विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. शहादा शहरातील मुख्य प्रवेशद्वार लगत असलेल्या नियोजित महाराष्ट्र भूषण राजे छत्रपती शिवाजीराजे स्मारक पुतळाच्या जागे पासंसून शहरातील प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांच्या सह शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख राजेंद्र चव्हाण, संकल्प गृप सदस्य उपस्थित होते. यावेळी पालिका सहल प्रमुख भूषण सोनार यांनी दिली आहे.

नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासुन स्वच्छता मोहीम सुरू केली दोंडाईचा रोड, सप्तशृंगी माता मंदिर समोर, भगवा चौक, तालुका खरेदी विक्री संघाच्या समोर, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय समोर, कै. डॉ. विश्राम काका पाटील शैक्षणिक संकुल समोर, महात्मा फुले चौक, तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, श्री महावीर बजरंग हनुमान मंदिर समोर, होत. प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

माझी वसुंधरा अभियान स्वच्छता महाराष्ट्र अभियान शहराच्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी पालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी, संकल्प गृपचे सर्व सदस्य यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरून स्वच्छता अभियान राबविले आहे. शहरात स्वच्छता अभियान सुरू झाल्यामुळे नागरिकांनां प्रेरणा मिळनार आहे. शहर, रोड-रस्ते, गल्ली - बोळ आपले आहेत, ते स्वच्छ ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच असते. घराघरांत निघालेला केरकचरा हा रस्तावर-गटारीत,मोकळे जागेवर टाकु नये.

पालिकेच्या स्वच्छता विभाग यांच्या शहरातील विविध भागात स्वच्छता दूत चारचाकी वाहन गल्लीत घरोघरी जाऊन केरकचरा गोळा करत असल्याने आपण प्रत्येक व्यक्तीने केरकचरा स्वच्छता दूत वाहनात टाकुन गल्लोगल्ली - शहर स्वच्छ ठेवुन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहभागी होत माझी वसुंधरा अभियान स्वच्छता महाराष्ट्र (नागरी) संकल्पना प्रत्यक्षात सातत्य राखण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान स्वच्छता मोहीम दरम्यान स्वच्छता दूत यांना शपथ दिली याच सोबत शहरातील दुकानदार यांना स्वच्छता अभियान मोहिम बाबत माहिती दिली आहे.

- भूषण सोनार, न. पा. सहल समन्वयक

शहर स्वच्छ राहावे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये, याकरिता शासनाच्या स्वच्छता अभियान यात सहभागी होत स्वच्छता बाबत प्रतिज्ञा करू या! घरातील स्वच्छता राखत कुटुंबाची जबाबदारी राखतो त्याच बरोबर शहर माझे आहे स्वच्छ शहर सुंदर शहर साठी प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे.

डॉ.लक्ष्मण सोनार, संकल्प गृप, शहादा

शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पालिकेच्या स्वच्छता विभाग कर्मचारी, सामाजिक संस्था संकल्प गृप यांच्या सहकार्याने आयोजित स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी अभियानात सहभागी राहावे.

अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com