Photos # मोलगी परिसरातील रस्ते पावसाच्या पाण्यात गेले वाहून

पावसाच्या पाण्यात वाहून गेले अनेक रस्ते, संबधीत विभागाचे दुर्लक्ष
Photos # मोलगी परिसरातील रस्ते पावसाच्या पाण्यात गेले वाहून

मोलगी । Molgi । वार्ताहर

मोलगी परिसरातील अनेक गावांत तसेच नर्मदा काठावरील गावांना जोडणारे अनेक रस्ते पावसाच्या (roads are rainy) पाण्यात वाहून (swept away in the water) गेल्याने अजूनही या गावातील लोकांना मुख्य बाजारेठ व दवाखान्या पर्यंत पोहचण्यासाठी अनेक दिवसापासून पायी प्रवास (travel on foot) करावा लागत आहे. अनेक ठिकाणी फरशी व पुल वाहून गेल्याने पाऊस पडला की रस्ता बंद अशी परिस्थिती आहे आजही आहे. त्यामुळे या भागातील लोकांना दवाखान्या (clinics) पर्यंत पोहचन्यासाठी बांबूलंन्स (Bambulans) चा उपयोग करावा लगतो. मोलगी ते वळफडी रस्त्यावर अनेक ठिकाणी मातीचे मलबे आहेत. फारशीच्या अपूर्ण कामामुळे अनेक ठिकाणी माती धसल्याने अपघाताचे (accident) कारण बनत आहे.परिसरातील लोकांना रोज या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

पिंपळखुंटा येथील सोंगआंबा हाकडी नदीवर बांधण्यात आलेला फरशी पुल पावसाच्या पहिल्या पावसातच वाहून गेल्याने अजूनही तो त्याच परिस्थितीत आहे.दर वर्षी या ठिकाणी हीच परिस्थिती असते एवढ्या मोठ्या बारमाही नदीवर तात्पुरता साध्या स्वरूपाचा पुल उभारून पुलाची दुरुस्ती केली जाते.नंतर दर वर्षी तोच प्रश्न कायम असतो.या नदी वर मोठ्या पुलाची मागणी अनेक वर्षा पासुन होत असली तरी ती पूर्ण होत नाही.

त्यामुळे बर्डी.हुणाखांब,वेहगी,मोवाण.बोगदा.पोपटिबार तसेच मोकस पांढरामाती,वळफडी,केवडी, कुकडीपादर पर्यंत हा रस्ता असून महाराष्ट्र स्टेट हायवे नंबर 1 असलेल्या रस्त्याची दुरावस्था ही पाहण्याजोगी आहे.अधिकारी याच रस्त्याने येतात जातात तुटलेला गावांना संपर्क व रस्त्याची पाहणी पण होते.

परंतु या रस्त्या साठी कोणीही पुढे आलेले दिसत नाही.ठीकठिकाणी फरशी पुलाचे काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी मातीच्या मलब्यातून प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Photos # मोलगी परिसरातील रस्ते पावसाच्या पाण्यात गेले वाहून
बंडखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठीच आदित्य ठाकरेंचा दौरा यशस्वी करणार

आशा वर्करनी रस्ता केला साफ

अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या चढाव घाट सेक्शच्या असलेल्या कुंडी होराफळी रस्त्यावर मातीच्या मलबा पडुन असल्याने वाहनधारकांना वाहन निघु शकत नसल्याने अखेर वाहनातील प्रवाशी आशा वर्कर व मुलींनी जागोजागी पडलेले मातीच्या मलबा सरकवुन दगड गोटे उचलुन बाजुला केल्यावर मोटरसायकल निघु लागल्या तेव्हा वाहनधारकांनी ह्या आशा वर्कर व मुलींच्या कार्याचे कौतुक करीत होते. मात्र संबधित विभागाकडुन उपाययोजना करण्यात येत नसल्याचे सागण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com