
बामखेडा - प्रतिनिधी nandurbarr
यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व काही वेळेवर होत असले तरी (Farmers) शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. (Chemical fertilizers) रासायनिक खतांचा तुटवडा भासेल किंवा पुरवठा झाला तरी जादा भावाने खरेदी करावी लागेल, अशी भीती आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होती. याउलट सध्या रासायनिक खतांचे भाव स्थिर असले तरी काही बियाणे कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (Soybean) सोयाबीनच्या दरात 40 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच 30 किलो सोयाबीन बियाणांसाठी शेतकऱ्यांना सुमारे 1700 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
गतवर्षी सोयाबीनची गोणी 2,250 रुपये होती, मात्र आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 3,900 रुपये मोजावे लागणार आहेत. ऐन खरीपाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी : यंदा सोयाबीनच्या त्याच बियाणासाठी शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. सदर कंपनी प्रशासनाने बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होणार आहेत.
- संजय सोनवणे शेतकरी