तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

सोमावल | वार्ताहर :- SOMAVAL

तळोदा येथील वल्लभ वेडु सूर्यवंशी (Vallabh Vedu Suryavanshi) (वय ८५, माळी) यांनी मरणोत्तर (Posthumously) देहदानाचा (body donation) आगळावेगळा संकल्प ()Sankalp केला आहे. तसे इच्छापत्र (Will) त्यांनी शासकीय महाविद्यालयाला (Govt College) दिले आहे. त्यांच्या या अनोख्या देहदानाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग

प्रत्येकाच्या शरीरात आत्मा असतो, तो अमर असतो. माणसाने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते. एका जन्मात सर्व कर्मभोग संपले नाहीत तर पुनर्जन्म होतो. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करावेच लागतात. ते विधिवत, शास्त्रानुसार झाले नाहीत तर मृताचा आत्मा अतृप्त राहतो,

त्याचे दुष्परिणाम त्याच्या कुटुंबाला भोगावेच लागतात अशा सर्व भाकडकथा माणसाचा मनावर पिढ्यानपिढ्या सतत बिंबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या खर्‍या वाटतात. त्यातून आपण भारतीय बाहेर पडूच शकत नाहीत अशी व्यवस्थाच निर्माण केली गेली आहे.

तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

पिंडदान, पितर, खांदे, दहावे, अकरावे, बारावे, तेरावे, मासिक श्राद्ध, वर्षश्राद्ध अशा कितीतरी खर्चिक, निरर्थक, अनिष्ट, वेळखाऊ कर्मकांडे असतात व ती कर्मकांडे करावी लागतात. ही कर्मकांडे केली नाही तर काही म्हणजे काहीही वाईट होत नाही आणि होणे शक्यही नाही.

आत्मा नसतोच म्हणून मरणोत्तर अंत्यसंस्काराचा कोणताही धार्मिक विधी, कर्मकांडे मुळीच करू नये अशी संकल्पना मनात सतत ठेवून जगणारे वल्लभ वेडू सूर्यवंशी (वय ८५) यांनी मरणोत्तर सर्व धार्मिक विधी, कर्मकांडे न करता दि. १ जानेवारी २०१९ रोजी मरणोत्तर देहदानाची इच्छा प्रकट करून संपूर्ण देहदानाचा संकल्प केला आहे.

तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

मरावे परी किर्तीरुपी उरावे ही खूणगाठ मनात ठेवून त्यांचे लहान शालक प्रा.मितलकुमार टवाळे, लहान भाऊ प्रा. रमेश सूर्यवंशी, पत्नी सौ. शांतीबाई सूर्यवंशी, शालक हेमचंद्र रामा टवाळे, डॉ.कल्याणी महाजन, मुले अरुण सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, मुली रंजना बत्तीसे, कल्पना मगरे, सून मंगला सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी तसेच नातवंडे, जावई यांच्याशी देहदानाविषयी चर्चा करून संपूर्ण देहदानाच्या अंतिम निर्णय घेतला.

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चिकित्सा व संशोधनासाठी मानवी देहाची गरज असते. परंतू देहांचा कमतरतेमुळे, अभावामुळे ते योग्य शिक्षण घेऊ शकत नाहीत. या विद्यार्थ्यांनी आपल्या देहाचा उपयोग करून, मानवी शरीराची रचना अभ्यासून चिकित्सक डॉक्टर बनावे व पुढे आपल्या वैद्यकीय कारकीर्दीत पेशंटवर योग्य उपचार करून पेशंटचे जीवन वाचवावे अशी इच्छा वल्लभ वेडू सूर्यवंशी यांची आहे.

मरणोत्तर मानवी अवयवांची, देहाची एकतर राख होते किंवा माती. यास्तव मृत्यूनंतर आपले शरीर कोणाच्यातरी उपयोगी पडावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन दि.१६ फेब्रुवारी २०१९ रोजी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडे मरणोत्तर देहदान संबंधीचे इच्छापत्र भरून पाठविले.

त्यास हिरे महाविद्यालयाचकडून संमती मिळाली आहे. या महान कार्य व संकल्पासाठी तळोदा येथील समस्त माळी समाजातर्फे श्री संतश्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त सन्मानचिन्ह, मानवस्त्र, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माळी यांच्या हस्ते देवून त्यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com