कोरडी व देहली नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कता बाळगावी

निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांचे आवाहन
कोरडी व देहली नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कता बाळगावी

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

कोरडी मध्यम प्रकल्प धरण (Dry Medium Project Dam) व देहली मध्यम प्रकल्पाच्या (Dehli Medium Project) धरण व पाणलोट क्षेत्रात (dams and catchment areas) पाऊस झाल्याने (Rainfall) प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ (Increase in water level) झाल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना (Citizens) सतर्कतेचे (alert) आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरडी मध्यम प्रकल्प धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 236.17 मीटरची नोंद झाली असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने कोरडी नदीच्या काठावरील पळशी, पळसून, डोंग,सागाळी, वडदे, खातगाव,वडफळी,बिलदा, डोगेगाव, जामदा, वासदा, चंदापूर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देहली बाबत आवाहन

देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 197 मीटरची नोंद झाली असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने देहली नदीकाठावरील डाव्यातीरातील रायसिंगपूर, पुर्नवसन आंबाबारी, जुना नांगरमुथा, नवा नांगरमुथा, घोटपाडा, कोराई, खापर तर उजव्या तीरावरील रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई तसेच उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा, पोहरा, गंगापुर, घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर,कंकाळी या कालव्यावरील गावातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com