शोध सामर्थ्याचा : कंपनीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणारे विजय बोरसे

शोध सामर्थ्याचा : कंपनीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणारे विजय बोरसे

नंदुरबार । महेश पाटील

आपल्या वडिलांच्या संघर्षमय जीवनातील यशस्वी प्रेरणा घेऊन खानदेशातील आदिवासी जिल्ह्यातील भालेरसारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन आज जागतिक पातळीवर स्थान मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणजे विजय भास्करराव बोरसे.

ग्रामीण समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत खूपच अनास्था होती. त्यामुळे या परिसरातील अनेक मुली शिक्षणापासून वंचित होत्या.ही परिस्थिती बदलावी म्हणून भास्करराव पाटील व त्यांच्या सहकारी मित्रांनी मिळून मुलींसाठी स्वतंत्र माध्यमिक विद्यालय सुरू करण्याच्या संकल्प केला. आरंभ म्हणून भालेर गावातील ग्रामदैवत श्री.काकेश्वर महाराजांच्या नावाने काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेची स्थापना 25 सप्टेंबर 1985 रोजी केली. तसेच जून 1986 पासून कन्या विद्यालय व परिसरातील गावांमधील मुलींची शिक्षणाची व राहण्याची सोय व्हावी यासाठी कन्या छात्रालय सुरू केले. या काळात संस्थेला व स्वतः भास्करराव पाटलांनादेखील अनेक प्रकारांनी विरोध झाला. मात्र व्यापक समाजहित व दृढ निश्चय यामुळे संघर्षमय वाटचालीत उदात्त हेतुला पालकांचा प्रतिसाद संस्थेच्या कसोटीच्या काळात महत्वपूर्ण ठरला. संस्था ग्रामीण भागात व लहान असूनही आज स्पर्धेच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवीत आहे. भास्कर पाटील व त्यांच्या सहकार्‍यांचे परिश्रम, निर्णय क्षमता, धैर्य,जिद्द,धाडस, चिकाटी व कर्मचारी यांच्यावरील प्रेम व विश्वास यामुळे संस्थेचा शैक्षणिक विकास व गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे.

या सर्वांची प्रेरणा घेऊन आपल्या वडिलांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाविन्याच्या शोध घेत विजय बोरसे यांच्या जीवनाच्या प्रवास सुरू झाला.

विजय भास्करराव बोरसे यांनी भालेर येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. नंतर पुढे धुळे व नंदुरबार येथून माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले. धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस . इंजीनियरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग मधील पदविका व पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच लहान भावाला ब्रेन टयूमरची लागण झाली. त्यामुळे घरची परिस्थिती हालाखीची बनली तशातच हवा तो जॉब व हवी तशी नोकरी न मिळाल्याने मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक वजन काटा विकण्याचे काम काही काळ केले. त्या दिवसात एक वडापाव खाऊन व अपमान सहन करून जीवनाची गाडी सुरू ठेवली.

संगणक क्षेत्रात एका महत्त्वाच्या ट्रेनिंगची माहिती मिळाली. त्यात ट्रेनिंग घेतली पण धुळ्यासारख्या ग्रामीण भागातील असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नव्हते. त्यामुळे 200 कंपन्यात अर्ज करूनही जॉब मिळत नव्हता. त्यानंतर इंग्रजी भाषेवर मेहनत घेऊन विप्रोसारख्या कंपनीत जॉब मिळविला. विप्रोत असताना सन 2000 मध्ये जपान येथे कामानिमित्त जाण्याची संधी मिळाली. येथील वास्तव्यात नवीन टेक्नॉलॉजी गुणवत्ता व जीवनमूल्य याबद्दलची जागरूकता निर्माण झाली. यानंतर जगभर प्रवास केला. जपानमधील वास्तव्याच्या त्यात मोलाचा वाटा होता. त्यामुळे बाकलेससारख्या जागतिक बँकेत उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. काम करत असतांनाच आपल्या ज्ञानाच्या आपल्या समाजासाठी व ग्रामीण भागातील तरुणांना फायदा व्हावा म्हणून बाहेर स्टडी सेंटरची स्थापना करून विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांचे मार्गदर्शन दिले. ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शैक्षणिक वेबसाईट निर्मिती केली. शैक्षणिक संकल्पना निमेशन स्वरूपात मांडण्यात आली. यासाठी पाच लोकांची टीम तयार करण्यात आली.

यात कंपनीचे डायरेक्टर विजय भास्करराव बोरसे व मॅनेजिंग डायरेक्टर सौ.प्राजक्ता बोरसे यांनी मिळून कालांतराने 12 जानेवारी 2015 मध्ये त्याचा व्यावसायिक स्वरूपात विस्तार करण्याच्या निर्णय घेण्यात आला. या दिवशी पुण्यातील औंध येथे 10 बाय 10 जागेच्या रूममध्ये एक्सलंसिया डिजिटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड स्थापना करण्यात आली. या कंपनीने ई लर्निंग इंडस्ट्रीयल डिझाईन व निमेशन सर्विस यामुळे एक्सलंसिया या कंपनीला अनेक नामांकित उद्योगाकडून कामे मिळालीत. यात पहिला प्रोजेक्ट किर्लोस्कर कंपनीकडून मिसाईल क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. हा प्रोजेक्ट संरक्षण क्षेत्राची निगडित असल्याने स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी वाढली. त्याचबरोबर बजाज आलियन भारत फोर्ज टाटा क्यूस्कोप, कल्याणी आयफोन आयटीसी लिमिटेड व भारतात ट्रक बनवणारी कंपनी आयशर वोल्वो हिंदुजा ग्रुपच्या अशोक लेलँड वोल्वो व टाटा मोटर्स अशा नामांकित कंपन्यांनी त्यांच्या कामासाठी एक्सलंसियाची निवड केली आहे. भारत फोर्ज कंपनीतर्फे महत्वाच्या अमेरिकेतील क्षेत्रातील काम करणार्‍या नासा कंपनीच्या टर्बोजेट टेस्टिंग फॅसिलिटीची उभारणी करण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. संरक्षण क्षेत्रातील नवीन तोफांची निर्मितीमध्ये योगदान दिले. आर्मी नेव्ही एअर फोर्स आदी क्षेत्रात महत्त्वाचे प्रोजेक्ट पार पाडले.

नंदुरबार येथील होतकरू युवकांना हायटेक क्षेत्रात संधी मिळावी म्हणून कंपनीची नंदुरबार येथे शाखा सुरू केली. पुणे व नंदुरबार येथून कार्यरत असलेल्या एक्सलंसिया डिजिटल टेक्नॉलॉजीच्या डिफेन्स क्षेत्रात केलेल्या योगदानाचे अहमदाबाद येथील डिफेन्स एक्सपो 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत कौतूक करण्यात आले. या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत यावर अधिकाधिक भर देण्यात आला होता. डिफेन्स एक्सपो अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांनी भाग घेतला होता. यात एक्सलंसियाने मदत केलेल्या कंपन्यांनी त्यांची उत्पादने प्रदर्शित केली होती. सर्व कंपन्यांना एक्सलंसियाने उपलब्ध केलेल्या टेक्नॉलॉजीचा विशेष उल्लेख केलेला होता. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेना प्रमुख संरक्षण मंत्री राजू यांच्याकडून एक्सलंसियाने केलेल्या कामाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली. त्याचबरोबर ही कंपनी जागतिक दर्जाच्या कंपन्यांना टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस देत असते. कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ.प्राजक्ता बोरसे यांची नॅशनल उद्योजक सेलवर निवड झाली असून उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत करतात.

अनेक सामाजीक कामात ते पूढे असतात. 2020 साली कोरोना प्रतिबंधासाठी त्यांनी भालेर, तिसी, नगाव व वडवद येथे प्रत्येक घरात कोरोना प्रतिबंधक किटचे एक्सलंसियातर्फे वाटप केले. तसेच यंदा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना 75 सायकल वाटप केल्या. त्यामूळे विद्यार्थ्यांचे स्वताच्या प्रगतीवर लक्ष देणे सोपे झाले. शाळेत येण्याजाण्याचा वेळ वाचला. विजय बोरसे यांना ट्रॅकींगची आवड आहे. आतापर्यंत त्यांनी हिमालयात अनेक ट्रॅक यशस्वीपणे पार पाडले आहेत. सिक्कीम येथील ट्रॅक करत असतांना त्यांना व सहकार्‍यांना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी खास राजभवनावर बोलावून सत्कार केला होता.

यापुढे देशात व प्रदेशात आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रात विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे.

विजय भास्करराव बोरसे कंपनीचे डायरेक्टर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com