वीजपुरवठा खंडितची तक्रार करा मिस कॉल व एसएमएसवर

 वीजपुरवठा खंडितची तक्रार करा मिस कॉल व एसएमएसवर

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार (Complaint of power outage) मिस कॉल एसएमएस करून नोंदविण्याची सुविधा (Registration facility available) महावितरणने (MSEDCL) उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी 022-41078500 हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच (Customers) या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून 022-41078500 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा एसएमएस पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व 9930399303 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.

या एका एसएमएसद्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अ‍ॅप अथवा 1800-233-3435, 1800-102-3435, 1912 या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो.

याशिवाय NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून 9930399303 या क्रमांकावर मएसएमएसफ पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल.

संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचार्‍यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल अ‍ॅप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com