world record वय अवघे दाेन वर्ष ११ महिने आणि जागतिक वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

जुनवणे येथील स्वर्णिमची सोनेरी कामगिरी, एका मिनीटात मानवी अंग ओळखून बोलण्याचा केला विश्वविक्रम
world record वय अवघे दाेन वर्ष ११ महिने आणि जागतिक वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

शहादा | ता.प्र.- SHAHADA

शहादा तालुक्यातील जुनवणे येथील रहिवासी व सध्या पुणे (pune) येथे वैद्यकीय सेवेत असलेले डॉ.सागर पाटील व डॉ.शिवानी पाटील यांची कन्या स्वर्णीम सागर पाटील (Swarnim Sagar Patil) (वय २ वर्ष ११ महिने) हिने कमी वयातील भारतीय बालक म्हणून एका मिनिटात जास्तीत जास्त मानवी शरीराचे अंग ओळखणे आणि बोलण्याचा जागतिक विक्रम (world record) आपल्या नावावर संपादीत केला आहे. स्वर्णिम हिने हे यश संपादित करत जागतिक वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस या रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करत संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त केला आहे.

स्वर्णीमच्या या उत्कृष्ट कामगिरी मागे आई-वडील यांच्यासह तिच्या आत्या डॉ. मृगनयनी पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले. ती जुनवणे येथील पोलीस पोटील हिरालाल पाटील (दिलीपभाई) यांची नात आहे. कु.स्वर्णिम हिला पुणे येथे नुकताच एका कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास उपायुक्त शिवाजी बोडके, टाइम्स ऑफ इंडियाचे ब्रँच मॅनेजर प्रवीण करडेल उपस्थित होते.

अवघ्या २ वर्ष ११ महिने इतक्या कमी वयात आपल्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर जागतिक स्तरावर जागतिक विक्रमाची नोंद करत नंदुरबार जिल्ह्यातील सुपुत्रीने केलेली ही कामगिरी निश्चित कौतुकास्पद आहे.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी अखिल भारतीय लेवा पाटीदार गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील, कार्यकारणी, व्हीएसजीजीएम, गुजर समाज मंच व केदारेश्वर प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे कौतूक करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com