सीलबंद बायोडिझेलची परस्पर विक्री

सीलबंद बायोडिझेलची परस्पर विक्री

नंदुरबार । Nandurbar

अक्कलकुवा तालुक्यात बायोडिझेल सारखा पदार्थ विक्री करण्याचा उद्देशाने ठेवला असता महसूल विभागाने सीलबंद केला. असे असतांनाही 12 लाख 64 हजाराचा अवैध बायोडिझेल परस्पर विक्री करून टाक्यांमध्ये पाणी भरल्याप्रकरणी केल्याप्रकरणी सात जणांविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील उदेपूर गावाच्या शिवारातील 44/1 येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुनिल छबीदास सुर्यवंशी यांनी बायोडिझेल तत्सम पदार्थ सुरक्षितेचे काळजी न घेता मानवी जीवीतास हानी पोहोचण्याची शक्यता असतांनाही बायोडिझेल साठवणूक करून विक्री करण्याचे धाडस केले होते. याबाबत सदर मालमत्ता दोन पंचासमक्ष सील करून सुनिल सुर्यवंशी यांच्या ताब्यात देण्यात आली होती.

सील असतांनाही 10 लाख 40 हजाराचे 13 हजार लिटर अवैध बायोडिझेल परस्पर विक्री केले. तसेच चार टाक्यांपैकी दोन टाक्या बायोडिझेल सदृश्य व पाणी भरल्याचे आढळून आले म्हणून पुरवठा निरीक्षक गुलाब राजाराम बागले यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुनिल छबीलदास सुर्यवंशी, अल्पेशभाई मवानी पटेल रा.सुरत (गुजरात), भिमसिंग माकत्या वसावे रा.मोठे उदेपूर (ता.अक्कलकुवा) यांच्या विरूध्द भादंवि कलम 406, 188, 285, 34 सह जिवनावश्यक वस्तु अधी क. 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोसई रमेश पाटील करीत आहेत. तर दुसर्‍या घटनेत कृष्णा राजाराम चौधरी यांनी बायोडिझेलची मालमत्ता सील असतांनाही 2 हजार 800 लिटर अवैध बायोडिझेल परस्पर विक्री करून टाक्यामध्ये बायोडिझेल सदृश्य व पाणी भरल्याचे आढळून आले म्हणून पुरवठा निरीक्षक गुलाब राजाराम बागले यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कृष्णा राजाराम चौधरी रा.खापर (ता.अक्कलकुवा), राजपुरोहित मदतनसिंग रा. वाकल (जि.सुरत), किरण हरी चौधरी, रमेश मोत्या वसावे रा.खापर (ता.अक्कलकुवा) यांच्याविरूध्द भादंवि कलम 406, 188, 285, 34 सह जिवनावश्यक वस्तु अधी क. 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोसई निलेश राऊत करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com