रावण गृप म्हणतोय अभिनेत्री राखी सावंतवर गुन्हा दाखल करा....

रावण गृप म्हणतोय अभिनेत्री राखी सावंतवर गुन्हा दाखल करा....

नंदुरबार ।Nandurbar। प्रतिनिधी

सोशल मिडीया, (Social media) इन्ट्राग्रांम या अ‍ॅपवर अभिनेत्री राखी सावंत (actress Rakhi Sawant) यांनी आदिवासी समाजाबद्दल (tribal society) अंगप्रदर्शनाद्वारे बदनाम (Notoriety through gestures) करत असल्याचा व्हिडीओ टाकून आदिवासी समाजाचा भावना दुखावल्या. या अभिनेत्रीवर गुन्हा (crime) दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रावण गृप फाऊंडेशनतर्फे (Ravana Group Foundation) नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकसीत परिषद (Akhil Bharatiya Adivasi Vikas Parishad) प्रणित रावणगृप फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात (Statement) म्हटले आहे की, सोशल मिडीया (Social media) अ‍ॅपवर अभिनेत्री राखी सावंत (actress Rakhi Sawant) यांनी आदिवासी समाजाचा भावना दुखावल्या आहेत. आदिवासी समाज हा देशातील मुळ निवासी असून तो शांत व प्रामाणिक स्वभावाचा असून सदर समाजाबाबत दिवसेंदिवस सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकण्यात येत आहे.

या अभिनेत्रीने असेच कृत्य आदिवासी समाजाबद्दल केले. सदर अभिनेत्रीवर सायबर क्राईम (Cyber Crime) व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदानुसार कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी रावणगृपचे धुळे जिल्हाध्यक्ष निलेश पावरा, एकलव्य आदिवासी सेनेचे नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष देवा पाडवी, जुनमोहिदे अध्यक्ष अभि भिल्ल, सदस्य सागर भिल, समाधान सोनवणे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com