अक्कलकुवा तालुक्यात शिधापत्रिका धारकांना दिवाळी किटची प्रतिक्षा

रेशन दुकानदारांपर्यंत अद्यापही पुर्ण शिधाजिन्नस पोहचलेच नाही
अक्कलकुवा तालुक्यात शिधापत्रिका धारकांना दिवाळी किटची प्रतिक्षा

मोलगी Molgi ता.अक्कलकुवा । वार्ताहर

अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यात आनंदाच्या शिधा (Anandacha Shidha') अभावी दिवाळीचा गोडवा गेला आहे. महाराष्ट्र शासनाची (Maharashtra Govt) बहुचर्चित आनंदाच्या शिधा या शंभर रुपयाच्या किटला अक्कलकुवा तालुक्यातील रेशन दुकानदारांपर्यंत (ration shopkeepers) पोहचविण्याचे, काम (deliver work) सुरू आहे मात्र लक्ष्मी पूजनाच्या (Lakshmi Puja) दिवसा पर्यंत किट मधील (Complete items kit) पुर्ण वस्तु न आल्याने (not coming) तालुक्यातील शिधा पत्रिका धारकांना अद्याप पर्यंत आनंदाचा शिधा मिळाली नसल्याने गरीब आणि गरजु नागरिकांची दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदाची शिधाच्या प्रतिक्षेत त्यांच्या आनंदावर विरजन (Deprivation of pleasure) पडले आहे.

अक्कलकुवा तालुक्यात एकुण 201 स्वस्त धान्य दुकाने आहेत.त्यात अंत्योदयचे 18862 तर प्राधान्य क्रमाचे 22004 असे एकूण 40866 शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना आनंदाची शिधा वाटपासाठी एकूण 40,866 किलो साखर तर तेवढेच पामतेल, रवा, चनाडाळ याची आवश्यकता आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत संबंधित यंत्रणेकडून 31 हजार 800 लिटर पामतेल, 19 हजार 500 किलो रवा, तर 24 हजार 750 किलो चनाडाळ प्राप्त झाली आहे.त्यापैकी चनाडाळ ही शुक्रवारी दुपारी गोडाऊनला आल्याने ती रेशन दुकानदारांपर्यंत पोहचलेली नव्हती. तालुक्यातील काही रास्त धान्य दुकानांत पाम तेल,रवा,चनाडाळ पोहोच करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप पर्यंत साखरेची उपलब्धता दुकान दारांना न झाल्याने तालुक्यातील शिधा पत्रिका धारक हे दिवाळीच्या पर्वात आनंदाच्या शिधा पासुन वंचित झाले आहेत त्यामुळे शासनाच्या या बहुचर्चित योजनेचा अक्कलकुवा तालुक्यात बोजवारा झाल्याचे चित्र आहे.अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी अक्कलकुवा तहसिल कार्यालयात फेरी मारली असता सुट्ट्या असल्याने कार्यालयाला कुलुप होते.त्यामुळे पुढील वस्तूं उपलब्धता व वितरण या बाबत अधिक माहिती मिळु शकली नाही.

राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत रास्त दुकानातंर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना दिवाळी सणानिमित्त नियमीत अन्न धान्य व्यतिरीक्त प्रत्येक एक किलो रवा, एक चनादाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल या प्रकारे दिवाळी किटचे वितरीत करण्यात येणार होती. त्यामध्ये नंदुरबार तालुक्यात 58 हजार 747 शिधा जीन्नस वाटपाचे नियोजन होते. मात्र लक्ष्मी पुजनापर्यंत नंदुरबार तालुक्यात 56 टक्के दिवाळी किट उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात चारपैकी तीनच वस्तु वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बहुचर्चित शासनाची आनंदाची शिधा या योजनेचा तालुक्यात पुर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.शासनाच्या योग्य नियोजना अभावी तालुक्यातील आदिवासी गरीब नागरिकांना आता पर्यंत आनंदाची शिधा मिळालेला नाही.रास्त दुकान धारकांना केवळ पामतेल ,रवा याचेच वितरण करण्यात आले आहे.चणाडाळ आणि साखर या दोन्ही वस्तु अद्याप पर्यंत देणेच बाकी आहे त्यामुळे शासनाच्या या योजनेने गरिबांची थट्टा केली असुन गरिबांची दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदाच्या शिधाच्या प्रतिक्षेतच जात आहे.

आमदार आमश्या पाडवी विधान परिषद सदस्य, अक्कलकुवा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com