रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन

गुजरात व महाराष्ट्रातील नागरीक सहभागी, आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन

तळोदा / मोदलपाडा ता.तळोदा | वार्ताहर -Nandurbar

तळोदा ते नंदुरबार (Taloda to Nandurbar) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी (road repairs) गुजरात व महाराष्ट्र सीमावरती भागातील (Gujarat and Maharashtra border areas) गावकर्‍यांनी (villagers) आज रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे (National Highways Department) अधिकारी ()Officialsयेत नाही व रस्ता दुरुस्ती करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा गावकर्‍यांनी दिला होता.परंतु कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग (धुळे) यांच्या अधिकार्‍यांनी गावकर्‍यांना रस्ता दुरुस्तीचे (Road repair)लेखीपत्र व आश्वासन (letter and assurance) दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणार्‍या तळोदा ते नंदुरबार रस्त्याची अस्वस्थ अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून गावकर्‍यांना व वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.या रस्त्यावरून अनेकदा लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी रोज ये करत असतात मात्र त्यांनीही याकडे लक्ष देत नाही.

यामुळे शेवटी येथील अंतुर्ली, चिचोद, शेलू, वाका, हरदूली, सज्जीपूर गावचे नागरिक व शेतकर्‍यांनी आज सकाळी १० वाजेपासून रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली होती. अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदने देण्यात आली होती परंतु एकदाही या निवेदनाची दखल घेण्यात आली नव्हती. याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग धुळे येथून लेखी आश्वासन देण्यात आले .

यात म्हटले होते की, शेवाळी नेत्रांग राष्ट्रीय महामार्ग क्र ७५३ बी वरील वाका चार गावाजवळील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती आजपासून सुरू करत असून वरून कामाची नियोजन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून पक्की दुरुस्ती (डांबर काम) सुरू करण्यात येईल. या लेखी आश्वासनानंतर गावकर्‍यांनी रस्ता आंदोलन मागे घेतले याबाबत गावकर्‍यांनी व शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

नेत्रांग शेवाळी रस्ता कधी होणार

अक्कलकुवापासून तळोदा हद्दीतून जाणारा हा नवीन रस्ता मंजूर असूनही अजून पावेतो सुरू होण्याच्या हालचाली दिसून येत नाही. दरम्यान, हा नवीन रस्ता होणार असल्याने आहे आहे त्या रस्त्यावर देखभाल दुरस्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रस्त्यावर जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी पालकमंत्री खासदार, आमदार, सर्वच लोकप्रतिनधी जात असतात तरीही याचे गांभीर्य दिसून येत नाही. मात्र, यामुळे वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.एकपदरी रस्ता ठरतोय धोकादायक

हातोडा पुलामुळे तळोदा, नंदुरबार अंतर कमी झाल्याने सर्वच अवजड वाहने याच रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात नियमित होत असतात. अनेकांचे जीव यात गेले आहेत. वेग मर्यादा वाहनचालक पाळत नसल्याने धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे आता नेत्रग शेवाळी रस्ता लवकर काम सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com