स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन

शेतकर्‍यांना दिवसा 12 तास अखंडीत विज पुरवठा करण्याच्या मागणी
स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीतर्फे (State Electricity MSEDCL) नंदुरबार जिल्हयातील शेतकर्‍यांना (farmers) शेती पुरक पाणी पंपासाठी दिवसा अखंडीत 12 तास विज पुरवठा (Power supply) देण्यात यावा, यासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghatana) तालुक्यातील समशेरपूर फाट्याजवळ रास्ता रोको (Stop the way) आंदोलन करण्यात आले.

शेतकर्‍यांच्या (farmers) विविध प्रश्नांसाठी माजी खा.राजु शेंट्टी मागील आठ दिवसापासून महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांना 12 तास दिवसा वीज (Power supply) अखंडीत मिळावी व वीज वसुली ज्या पध्दतीने शेतकर्‍यांकडून वसूली केली जाते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक बाबर शाहीमध्ये जी हुकूमशाही केली जात होती. त्याचप्रमाणे शेतकर्‍याचा अपमान करून व आर्थिक नुकसान थांबवावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन (Statewide agitation) करण्यात येत आहे. मागील आठ दिवसापासून माजी खा.राजू शेट्टी शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याच्या असलेल्या मागण्या होऊन ठिय्या आंदोलन करीत आहेत.

त्या आंदोलनाला राज्य सरकार व महावितरण कंपनी(MSEDCL) यांनी गंभीरतेने न घेतल्याने स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे समशेरपूर फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना शेती पुरक पाणी पंपासाठी (Agricultural supplementary water pump) दिवसा अखंडीत 12 तास विज पुरवठा न केल्यास आमच्या शेतातून जाणार्‍या शहरी भागात वितरण केली जाते. त्यात व्यत्यय निर्माण करून आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नथू पाटील, तालुकाध्यक्ष ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com