
नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी
जिल्हयात गावठी हातभट्टीची दारु (Handful of liquor) व देशी विदेशी दारु बाळगणार्यांविरुध्द नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने (district police force) धडक मोहिम (Dhadak operation) राबवत 5 दिवसात 19 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत (Material seized) केला आहे.
होळी, धुलिवंदन व आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Police) नाशिक यांनी संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु (Illicit liquor) तस्करांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई (Strict action) करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते.
तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा व आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक (district police force) पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारु निर्मित करणारे, देशी विदेशी दारुची अवैध चोरटी वाहतुक करणार्यांविरुध्द विशेष मोहिम राबवून (Dhadak operation) कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात दि.11 ते 16 मार्च 2022 नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे 2, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे 4, उपनगर पोलीस ठाणे येथे 3, नवापूर पोलीस ठाणे येथे 6, विसरवाडी पोलीस ठाणे येथे 5, शहादा पोलीस ठाणे येथे 9, धडगांव पोलीस ठाणे येथे 2, सारंगखेडा पोलीस ठाणे येथे 3, म्हसावद पोलीस ठाणे येथे 3, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे 5, तळोदा पोलीस ठाणे येथे 3, मोलगी पोलीस ठाणे येथे 2 असे एकुण 47 गुन्हे हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतुक करणार्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
हातभट्टीची दारु (Handful of liquor) गाळणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतूक करणार्यांकडून 17 लाख 38 हजार 545 रुपये किमतीची देशी विदेशी दारु, 10 लाख 60 हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारु वाहतूक (Alcohol transport) करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहने, तसेच 1 लाख 96 हजार 675 रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मीत करण्याकामी उपयोगी पडणारा महु फुलांचा सडका वॉश व साहित्य असा एकुण 19 लाख 35 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतूक करणार्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असून नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतूक केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व पोलीस अमलदार, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केली. पुढील काळात देखील हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतुक करणार्यांविरुध्द् अशीच प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येणार आहे.