नंदुरबार जिल्हयात आयकर विभागाचे धाडसत्र

प्रतिष्ठीत नागरिक व बिल्डरांची चौकशी
नंदुरबार जिल्हयात आयकर विभागाचे धाडसत्र
नंदुरबार

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार जिल्हयात आज सकाळी सकाळीच आयकर विभागाने (Income tax department) नंदुरबारसह जिल्हयात प्रतिष्ठीत नागरिकांच्या घरी व प्रतिष्ठानांमध्ये धाडी टाकल्या. अद्यापही कारवाई सुरु असून या धाडसत्रात काय निष्पन्न झाले त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

नंदुरबार
S-400 missile भारताचे सुरक्षाकवच चीन-पाकचे क्षेपणास्त्र करणार निष्पभ्र

आयकर विभागाने संपुर्ण देशभरात बेहिशोबी मालमत्ता असणार्‍यांकडे धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशीर जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार, बनावट कागदपत्रे सादर करुन व्यवहार करणे,

सेवाभावी संस्थेच्या नावाखाली कोटयावधी रुपयांची मालमत्ता जमा करणार्‍यांवर आयकर विभागाची नजर आहे. त्या पार्श्‍वभुमीवर आज दि.२२ रोजी सकाळी सकाळीसच आयकर विभागाची पथके नंदुरबार जिल्हयात दाखल झाली आहे.

त्यांनी नंदुरबार शहरातील बिल्डर, प्रॉपर्टी ब्रोकर, बेहिशोबी मालमत्ता गोळा करणारे प्रतिष्ठीत नागरिकांच्या घरी तसेच प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या. तेथील कागदपत्रांची तसेच मालमत्तेची चौकशी केली. अद्यापही ही कारवाई सुरु आहे. त्यामुळे कारवाईत काय निष्पन्न झाले याची माहिती मिळू शकली नाही. आयकर विभागाने अक्कलकुवा व वेळदा येथेही धाडी टाकल्या आहेत.

नंदुरबार
चिनी मोबाईल कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com