नंदुरबार बाजार समितीवर रघुवंशी गटाची एकहाती सत्ता

शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी, विरोधी पॅनलला खातेही उघडता आले नाही
नंदुरबार बाजार समितीवर रघुवंशी गटाची एकहाती सत्ता

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत (election)माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी (Former MLA and Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi) गटाच्या शेतकरी विकास पॅनलने (Farmer Development Panel)एकहाती सत्ता स्थापन करुन ऐतिहासिक विजय (historic victory)मिळविला आहे. त्यांच्या पॅनलचे सर्वच 18 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपा पुरस्कृत विरोधी गटातील पॅनलला खातेही उघडता आले नाही. या निकालामुळे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांना राजकीय धक्का बसला आहे.

नंदुरबार बाजार समितीवर रघुवंशी गटाची एकहाती सत्ता
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

नंदुरबार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी काल दि.28 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. आज मतमोजणी करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून या निवडणुकीत चुरस पहायला मिळत होती. या निवडणुकीत सत्ताधारी चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटासमोर भाजपाचे डॉ.विजयकुमार गावित यांनी आव्हान उभे केले होते. त्यामुळे निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली होती. दरम्यान, आज मतमोजणी घेण्यात आली. यात शिवसेना नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. या निकालाचा आगामी नगरपालिका निवडणुकीवर परिणाम होणार आहे. निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांचा पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविल्यानंतर आमदार कार्यालय परिसरात पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांच्या असंख्य समर्थकांनी ढोल ताशांच्या गजर व फटाक्यांच्या आतिशबाजी, गुलालाची मुक्तहस्त उधळण करीत जल्लोेत्सव साजरा केला.

दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास अंतिम मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे विजयी झालेले सर्वच उमेदवार मतमोजणी कक्षातून बाहेर पडल्यानंतर ढोल ताशे व फटाक्यांच्या गजरात आमदार कार्यालयावर पोहोचले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड.राम रघुवंशी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

डीजेच्या तालावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी थिरकले

बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी झाल्यानंतर आमदार कार्यालयाच्या बाहेर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावर चांगले थिरकतांना पाहायला मिळाले.

आमदार कार्यालयाच्या बाहेर जल्लोष सुरू झाल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी थेट समर्थकांमध्ये गेले. हातात भगवा झेंडा घेत डीजेच्या तालावर ठेका धरला.

निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट यार्डात शेड बनवण्यात येईल. भाजीपाला लिलाव प्रक्रिया सकाळी पाच व दुपारी तीन वाजता सुरू होईल. स्वतंत्र कांदा लिलावाची व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

21 लाखांच्या पैजेची चर्चा?

नंदुरबार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व डॉ.विजयकुमार गावित यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. गेल्या महिन्याभरापासून निवडणूकीचे वातावरण तापले होते. भाजपाने या निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत मोठया प्रमाणावर ‘अर्थकरण’ झाल्याची चर्चा होती. अर्थकरण मोठया प्रमाणावर झाल्यामुळेच की काय एका राजकीय व्यक्तीने दुसर्‍या एका राजकीय व्यक्तीशी ‘आमचे पॅनल हमखास निवडेल’ यावर 21 लाखांची पैज लावल्याची चर्चा निकालानंतर दिवसभर सुरु होती. सदर रक्कम तिसर्‍या एका व्यक्तीकडे देण्यात येणार होती. पैज जिंकल्यानंतर त्या व्यक्तीकडून पैज जिंकणार्‍याला देण्यात येणार होती. हा आकडा कोणाकडून 21 लाख, कोणाकडून 31 लाख तर कोणाकडून 51 लाख सांगण्यात येत होता. मात्र, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होवू शकली नाही. परंतू या पैजेची दिवसरभर चर्चा सुरु होती. तसेच एका राजकीय व्यक्तीने पाच लाखांची पैज जिंकल्याचीही चर्चा होती.

सत्तेचा माज उतरला मतदारांनी विश्वास ेठेवून सर्व जागांवर उमेदवार विजयी केले आहेत. त्यामुळे आता जास्त जबाबदारी वाढलेली आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांची सेवा करण्याची पुनश्च संधी मिळालेली आहे. विरोधकांनी पैसा व संपत्तीच्या जीवावर पदाधिकार्‍यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. ज्यांना सत्तेच्या माज व सूज चढली होती ती आता निकालाच्या माध्यमातून उतरली आहे.

- चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार

कौल मान्य नंदुरबार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत विजयाची अपेक्षा होती. परंतू निकाल विरोधात लागला. त्यामुळे मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. मात्र,यापुढेही जनतेची सेवा हाच आमचा अजेंडा असेल.

- ना.डॉ.विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री

नंदुरबार बाजार समितीतील विजयी उमेदवार व कंसात मते

सहकारी संस्थांचा मतदार संघ

सुनिल भालचंद्र पाटील (423), कुशलचंद गणपती बिर्ला (408),

दिपक भागवत मराठे (407), ठाणसिंग भिका राजपूत (403),

किशोर देविदास पाटील (401), अनिल रघुनाथ गिरासे (394),

गोपीचंद गलचंद पवार (391).

सहकारी संस्थांचा मतदार संघ- महिला राखीव

संध्या वकील पाटील (मु.तलवाडे पो.खर्द खु. ता.नंदुरबार(445),

वर्षा शरद पाटील (पळाशी ता. नंदुरबार, (434)

सहकारी संस्थांचा मतदार संघ- अनुसूचित जमाती

लकडु रामदास चौरे (मु.अजेपुर पो.सुतारे ता.नंदुरबार, 439).

सहकारी संस्था मतदार संघ- इतर मागासवर्गीय

मधुकर टिकाराम पाटील (खोंडामळी ता .नंदुरबार,450)

ग्रामपंचायत मतदार संघ- अनुसूचीत जाती जमाती

विक्रमसिंग जालमसिंग वळवी

(मु.इसाईनगर पो.धानोरा ता.नंदुरबार,649)

ग्रामपंचायत मतदार संघ- आर्थिक दुर्बल घटक

संजय नरोत्तम पाटील (नळवे खु. ता.नंदुरबार,634)

ग्रामपंचायत मतदार संघ- सर्वसाधारण

विजय लिमजी पाटील (पथराई ता.नंदुरबार,616)

दिनेश विक्रम पाटील (भालेर ता.नंदुरबार,615)

पराभूत उमेदवार

रविंद्र भरतसिंग गिरासे, उमाकांत पुनाजी चौधरी, जितेंद्र नवलराव पाटील, बालु देविदास पाटील, महेंद्र सोमजी पाटील, किशोर नरारायण बारी तांबोळी, विक्रांत दिलीप मोरे, निर्मला नारायण पाटील, शंकुतलाबाई नाना पाटील, प्रभाकर गणेश वळवी, सुधीर हिरामण पाटील, प्रकाश कृष्णराव गावीत, शामु तुकाराम चौरे, संजय तुकाराम चौधरी, भास्करराव हिरामण पाटील

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com