नंदुरबार जिल्ह्यात 42 जणांवर हद्दपार व तडीपारीचे प्रस्ताव

नंदुरबार जिल्ह्यात 42 जणांवर हद्दपार व तडीपारीचे प्रस्ताव

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

कायदा आणि सुव्यवस्थेच्या law and order दृष्टीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील 42 जणांवर हद्दपार व तडीपाराचे deportation प्रस्ताव Proposal असून एकावर एमपीडीएचा प्रस्ताव देखील असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत Superintendent of Police Mahendra Pandit यांनी दिली.

जिल्ह्यातील वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे, उपद्रवी व गंभीर गुन्हे नावावर असलेल्या व्यक्तींचा पोलीसांकडून बंदोबस्त करण्यात येत आहे. यासाठी काहीजणांचे हव हद्दपारीचे व तडीपाराचे प्रस्तावदेखील तयार करण्यात आले आहेत.

त्यात नंदुरबार शहरासह तालुक्यातील 33, शहादा तालुक्यातील पाचजणांचा समावेश ओ. गणेशोत्सवाच्या आधीच त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकुवा येथील एकावर एमपीडए अर्थात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदाअंतर्गत प्रस्ताव आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये 22 गुन्हे दाखल आहेत.

जिल्ह्यात हा एकमेव प्रस्ताव आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही वचक ठेवण्यासाठी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून येत्या काळात सण व उत्सव शांततेत साजरा व्हावे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचीही माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com