विना परवानगी गैरहजर राहिल्याने मुख्याध्यापक निलंबित

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांची कारवाई
विना परवानगी गैरहजर राहिल्याने मुख्याध्यापक निलंबित

मोदलपाडा, ता.तळोदा | वार्ताहर TALODA

अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील कुंभारखान येथील शासकीय आश्रमशाळेतील (Government Ashram School) माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक (Principal) बेकायदेशीरपणे गैरहजर आढळून आल्याने त्यांना तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी निलंबीत केले आहे. या कारवाईमुळे केल्याने आश्रमीय कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाचे नूतन प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी गेल्या महिन्यात प्रकल्पाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कामांचा धडाका लावला आहे. सध्या ते प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांनादेखील भेटी देवून शाळांमधील सुविधा व शैक्षणिक कामांचा आढावा घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील कुंभारखान येथील शासकीय आश्रमशाळेस भेट दिली होती.त्यावेळी त्यांना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाब शिवाजी देशमूख बेकायदेशीरपणे गैरहजर आढळून आले.

सदर मुख्याध्यापकांनी कामात कसूर करत शिस्तभंग केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी बेशिस्त आश्रमीय कर्मचार्‍यांवर कारवाई बडगा उगारल्याने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही गैरवर्तणूकीबाबत बजावल्या नोटिसा

कुंभारखांन आश्रमशाळेतील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाब देशमुख हे यापूर्वीही विनापरवानगी शाळेत गैरहजर राहत असत.त्यांना तशा नोटीसादेखील बजावण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा न केल्याचे आदेशात नमूद केले आहे. पुन्हा पकल्प अधिकार्‍यांचा सोमवारचा आश्रम शाळेतील भेटीत विनापरवानगी गैरहजर आढळून आले होते.त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अक्कलकुवा तालुक्यातील कुंभारखान येथील शासकीय आश्रमशाळेस १२ डिसेंबर २०२२ रोजी अचानक भेट दिली असता माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गुलाब शिवाजी देशमूख हे विनापरवानगी गैरहजर आढळून आले होते. यापूर्वी देखील मुख्याध्यापक गुलाब देशमुख हे आपल्या कामामध्ये दिरंगाई व नेहमी गैरहजर राहत होते. या अगोदरदेखील त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्या वर्तुवणुकीमध्ये काहीच बदल होत नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- मंदार पत्की

प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी तळोदा.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com