श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला प्राईड नॅशनल अवाॅर्ड

जीवन माळी यांनी राजस्थानातील कोटा येथे स्विकारला सन्मान
श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला प्राईड नॅशनल अवाॅर्ड

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

सोशल मिडीयातून (Social media) शेकडो रक्तदात्यांना एकत्र आणून (Blood donation) रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत हजारो गरजूंना रक्तदान करुन जीवनदान देणार्‍या (Shri Chhatrapati Blood Foundation) श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा प्राईड नॅशनल अवॉर्ड (Pride National Award) देवून (Rajasthan) राजस्थानमधील कोटा येथे गौरव करण्यात आला. फाऊंडेशनचे जीवन माळी यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.

रक्तदान चळवळीत काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील राजस्थानमधील कोटा येथील ह्यूमन सोशल फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने रक्तदान जीवनदान समितीद्वारा कोटा येथे कोटा प्राईड नॅशनल अवॉर्ड या पुरस्काराचा वितरण सोहळा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देशातील रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्था आणि व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आलज्ञ. कॉन्फरन्सला कोटा येथील महापौर राजीव अग्रवाल, जेष्ठ समाजसेवक अमित धारिवाल, ह्यूमन सोशल फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक सचिन सिंगला,

रक्तदान जीवनदान सेवा समिती कोटाचे संस्थापक नीरज सुमन आदी उपस्थित होते. संस्था सचिव गोपाल विजयवर्गीय यांनी रक्तदान चळवळीत काम करणार्‍या संस्थांचा आणि व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत इतरांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन व्हॉटस् ऍप गृपच्या माध्यमातून दररोज गरजू रुग्णांना स्वयंस्फूर्तीने रक्तांच्या पिशव्या उपलब्ध करुन देणे तसेच जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यास शेकडो बॅग उपलब्ध करुन देण्याचे कौतुकास्पद काम निस्वार्थपणे करण्यात येते.

यामुळे सदर गृपच्या कार्याची दखल ह्यूमन सोशल फाऊंडेशनच्यावतीने घेत राष्ट्रीय स्तरावरचा प्राईड नॅशनल अवॉर्ड देवून गौरव करण्यात आला. सदर ऍवॉर्ड ग्रुपचे जीवन माळी यांनी स्वीकारला. श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या चळवळीत जीवन माळी, महेंद्र झवर, रामकृष्ण पाटील, अरुण साळुंखे, अजय देवरे, हितेश कासार, आकीब शेख व सुधीरकुमार ब्राम्हणे यांचे योगदान लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com