राष्ट्रीय ऍथलॅटीक्स स्पर्धेत प्रतिक पिंगळे तृतीय

राष्ट्रीय ऍथलॅटीक्स स्पर्धेत प्रतिक पिंगळे तृतीय

६३.९१ मीटर हातोडा फेक स्पर्धेत मिळविले यश

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (Athletics Federation of India) नडीयाद (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय ऍथलेटीक्स (National Athletics Competitions) स्पर्धेत हातोडा फेक क्रीडा प्रकारात नंदुरबार येथील खेळाडू प्रतिक दिलीप पिंगळे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत तृतीय (third) येण्याचा मान मिळविला.

ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने २ ते ४ जून २०२२ दरम्यान २० वी राष्ट्रीय ऍथलेटिक्स ज्युनिअर क्रीडा स्पर्धा (National Athletics Competitions) नडीयाद (गुजरात) येथे पार पडली.

या स्पर्धेत नंदुरबारचा खेळाडू प्रतीक दिलीप पिंगळे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत हातोडा फेक क्रीडा प्रकारात ६३.९१ मीटर हातोडाफेक करत तृतीय (third) येण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत या पुर्वी महाराष्ट्राला कधीही पदक मिळाले नव्हते. मात्र प्रतिकच्या रुपाने पहिल्यांदाच महाराष्ट्राने कांस्य पदक (Bronze medal) पटकावले आहे.

त्याच्या यशाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.प्रतीक पिंगळे याला क्रीडाशिक्षक प्रा.डॉ.मयूर ठाकरे, ऍथलेटिक्स खेळाडू हेमंत बारी, भूषण चित्ते यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com