
शहादा | ता.प्र. SHAHADA
राज्यात (maharastra) जाहीर करण्यात आलेल्या ९२ नगरपरिषदा (municipal council) व ४ नगरपंचायतींच्या (Election) निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) स्थगितीदिली आहे. या निवडणुकांमध्ये जिल्हयातील शहादा (shahada) तसेच (dhule) धुळे जिल्हयातील (Dondaicha and Shirpur) दोंडाईचा व शिरपूर नगरपालिकांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिकेची सुनावणी दि.१२ जुलै २०२२ रोजी झाली.
त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या संदर्भातील पुढील सुनावणी दि.१९ जुलै रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने आयोगाचे राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
सदर निवडणूकांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम नंतर जाहीर करण्यत येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे संबंधीत नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता हटविण्यात आली आहे.