धरणात बुडून पोस्टमनचा मृत्यू

धरणात बुडून पोस्टमनचा मृत्यू

बोरद | वार्ताहर, तळोदा Taloda

तुळाजा (ता.तळोदा) येथील पोस्टमन (Postman) किरण हिरामण जांभोरे यांचा तूळाजा येथील धरणात (dam) बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली याबाबत मयताचे वडील हिरामण वल्लभ जांभोरे यांनी दिलेल्या खबरीनुसार तळोदा पोलीस (police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किरण हिरामण जांभोरे हे बोरद येथे आपल्या पत्नी व मुलासह राहत होते. दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ४ वाजेपासून घरातून कोणाला न विचारता व कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. तशी हरवल्याबाबतची तक्रार तळोदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. त्यांचा शोध घेतला असता कुठेही मिळून आले नाही.

काल दुपारी दोन वाजता त्यांचे वडील व काका तुळाजा येथील धरणाकडे पाहण्यासाठी गेले असता. त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तसेच धरणाजवळ असलेल्या जंगलात त्यांची मोटरसायकल आढळून आली. त्यामुळे हा मृतदेह किरण जांभोरे यांचाच असल्याचे सिद्ध झाल्याने वडील हिरामण वल्लभ जांभोरे यांनी बोरद दुरुक्षेत्राशी संपर्क साधून जमादार गौतम बोराडे यांना याबाबत सूचित केले.

गौतम बोराडे यांनी पोलीस नाईक विजय विसावे यांना घटनास्थळी तात्काळ पाठवले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरा बोरद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. नंतर वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास बोरद दुरुक्षेत्राचे पोलीस नाईक विजय विसावे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com