
नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने (police force) राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान (Special campaigns) 10 बेपत्ता पुरुष व 17 महिला अशा 27 बेपत्ता लोकांना (missing persons) शोधण्यात यश (Success in discovery) आले आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, यांनी दि.22 मे 2022 रोजी झालेल्या मासिक गुन्हे बैठकीत (Monthly crime meeting) हरविलेले पुरुष व महिला यांचा आढावा घेतला. त्यावेळेस सन 2014 पासून आजपावेतो 234 व्यक्ती (missing persons) अद्याप मिसिंग असल्याचे दिसून आले. यासाठी त्यांनी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे एक विशेष पथक तयार करुन जास्तीत जास्त बेपत्ता महिला व पुरुष यांचा शोध घेण्याकरीता विशेष मोहिम (Special campaigns) राबविण्याचे आदेश दिले.
सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये शहर पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथील प्रत्येकी 01 अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी 01 अमंलदार यांचे पथक तयार करुन त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिसिंग डेस्कचे प्रमुख सहा.पोलीस उप-निरीक्षक भगवान धात्रक यांनी नियंत्रण ठेवले.
विशेष पथकांनी 6 दिवसातच हरविलेले/बेपत्ता 10 पुरुष व 17 महिला अशा एकुण 27 हरविलेल्या व्यक्तींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.
मोहिमे दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडील 03 पुरुष व 03 महिला, नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे-01 महिला, तालुका पोलीस ठाणे-01 महिला, नवापूर पोलीस ठाणे-01 पुरुष व 02 महिला, शहादा पोलीस ठाणे-02 पुरुष व 05 महिला, सारंगखेडा पोलीस ठाणे-01 पुरुष, म्हसावद पोलीस ठाणे-01 पुरुष, धडगांव पोलीस ठाणे-01 पुरुष व 01 महिला, अक्कलकुवा पोलीस ठाणे-01 पुरुष व 02 महिला, तळोदा पोलीस ठाणे-02 महिला असे एकुण 27 हरविलेल्या व्यक्तींना 06 दिवसातच शोधण्यात (Success in discovery) नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.
पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडील आदेशान्वये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथील देखील मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आलेला आहे. मिसिंग डेस्कच्या (Missing desk) मार्फतीने पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेवुन ते मिळुन येण्याकरीता प्रयत्न केले जातात.
गुन्हे तपासाबरोबरच बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचा शोध घेण्याकरीता कसोशीने प्रयत्न करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत करुन ही मोहिम भविष्यात जास्त प्रभावीपणे राबविण्यात येईल असे निर्देश दिले आहेत.