महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सिमेवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१६ जणांना अटक, दोन लांखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सिमेवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नवापूर | श. प्र. - nandurbar

महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या नवापूर जवळील हॉटेल मानस याच्या शेजारील एका पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यांवर काल रात्री १ वाजेच्या सुमारास पोलीसांनी धाड टाकुन १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन याप्रकरणी महाराष्ट्र- गुजरात रात्यातील १६ जणांना अटक केली असुन अनेक जण फरार झाले आहेत..या कारवाई मुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. या धाडीत अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात राज्यातील अनेक प्रतिष्ठीत व्यापार्‍यांचा समावेश आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रीय महामार्ग लगत काल दि.१० ऑक्टोंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास हॉटेल मानसच्या शेजारी एका पत्र्याच्या शेड मध्ये झन्ना मन्ना नावाच्या जुगार खेळला जात असल्याचा बातमी वरून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात अधिकारी आणि पोलीसांनी ताफ्यासह छापा टाकला.

यावेळी बेडकी शिवारा लगत असलेल्या एका पत्र्याचा शेड मध्ये गुजरात राज्यातील व महाराष्ट्रातील जवळजवळ १६ जुगार खेळणार्‍याना अटक करत एक लाख पन्नास हजार चारशे रु रोख रक्कम सह एकूण एक लाख ८६ हजार पाचशे साठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत कारवाई करण्यात आली आहे. सदर हॉटेल परिसरात गुजरात राज्यातील अनेक वाहने उभी दिसून आल्याने ह्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जुगारी जमले असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलिसांच्या सुगावा लागताच शेतातून अनेक जुगारी पसार झाली असल्याची चर्चा परिसरातील नागरिकां मध्ये सुरू होती.

घटना स्थळी उभे असलेल्या वाहनावर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस उभे असल्याचे दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे यांच्या फिर्यादीवरू, मनोज परमार, सुरत, जगदिश ऊर्फ जिग्नेश पटेल सुरत, शैलेशभाई रंबारी, सुरत, तेजस मोदी, सुरत, कौशिकभाई गामीत बालपुर, ता. व्यारा, चंद्रपाल प्रजापती, सोनगड,अरुण कोकणी, पळसी, इसाक पटेल. बडोदा, शशिकांत कोकणी शेही,उमेशकुमार बागुल नवापाडा, हबीब शेख भरुच, सुरेश मानकर ताराहाबाद, विजयसिंग राणा भरुच, स्वप्निल मिस्तरी नवापुर, किरण चौधरी नंदुरबार, या इसमावर नवापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून जुगार खेळणार्‍यांना ताब्यात घेत उशिरा पर्यन्त कारवाई सुरू होती.

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं,पो हे का सुनिल बर्वे,विकास पाटील,गुमान पाडवी,दिलवर पावरा,दिनेशकुमार वसुले,हेमंत सैदाने,महिला पोलिस शितल धनगर, करीत आहे

Related Stories

No stories found.