मोर्चासाठी जाणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची पोलीसांकडून अडवणूक

तिसर्‍या दिवशी शांततेच्या मार्गाने काम बंद आंदोलन सुरू
मोर्चासाठी जाणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची पोलीसांकडून अडवणूक

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार आगारातून (Nandurbar depot) उशिरा रात्री मुंबई (Mumbai) येथे मोर्चासाठी (Morcha) निघालेल्या एसटी कर्मचार्‍यांची (ST employees) बस ( bus) पोलिसांनी (police) अडवून (stopped) शहर पोलिस ठाण्यात (city police station)जप्त (Seized) केली आहे. पोलिसांच्या दबावतंत्रामुळे मंत्रालयावर धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कर्मचार्‍यांची गळचेपी झाली आहे.दरम्यान तिसर्‍या दिवशी शांततेच्या मार्गाने काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे.

जिल्ह्यातील इतर आगारातील एसटी कर्मचारी सोयीनुसार आपापल्या पद्धतीने मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. परंतु रस्त्यात पोलिस प्रशासनाच्या वतीने अडवणूक केली जात आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एसटी कर्मचार्‍यांना घेऊन निघालेल्या बसच्या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाला विचारले असता सदर बसचे कागदपत्रे नसल्यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून मंत्रालयावर धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एसटी कर्मचार्‍यांची पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर सलग तिसर्‍या दिवशी आगार परिसरात शांततेच्या मार्गाने विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यानी संप सुरूच ठेवला असून एसटी प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे बंदच आहे.

जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार चारही आगारांमधून एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु रस्त्यात त्याची अडवणूक केली जात असली तरी एसटी कर्मचार्‍यांनी शासकीय सेवेत विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी सलग तिसर्‍या दिवशी शांततेच्या मार्गाने काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. मंत्रालयावरील धडक मोर्चानंतर शासन काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र घडविण्यात एसटीचा ही मोठा हातभार असून कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर शासनाने विचारपूर्वक न्याय द्यावा. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, यासारख्या राज्यांचा जीडीपी दर कमी असतानाही तेथील एसटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करून न्याय दिला आहे, तसेच महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्‍यांना ही शासनाने द्यावा अशी मागणी एसटी कर्मचार्‍यांनी केली आहे.

संपाला मनसेचा पाठींबा

महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या संपाला नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दिला आहे. यावेळी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्यांना पाठींबा पत्र देवुन मनसे पदाधिकार्‍यांनी चर्चा केली.

राज्यभर एसटी कर्मचार्‍यांचे संप सुरु आहे. या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन पाठींबा देण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने नंदुरबार आगारातील एसटी कर्मचार्यांची भेट घेत संपाला पाठींबा देण्यात आला. एसटी महामंडळातील सर्व कर्मचार्‍यांना शासनाने शासकीय सेवेत विलीनीकरण करून घ्यावे. तसेच वर्षानुवर्ष दिवस-रात्र सेवा बजावणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना इतर सर्व राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच वेतन व त्या संबंधातील सर्व सोयीसुविधा शासनाने त्वरित लागू कराव्यात, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. नंदुरबार येथील आगारातील एसटी कर्मचार्‍यांची भेट घेत नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा करुन संपाला पाठींबा दिला.

यावेळी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, मनविसेचे सैनिक राम ठक्कर, खोंडामळीचे गटअध्यक्ष कल्पेश माळी आदी उपस्थित होते. संपाला पाठींबा पत्र देण्याबरोबर एसटी कर्मचार्‍यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मनसे पदाधिकार्‍यांनी विचारपूस करीत चर्चा देखील केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com