बालाघाट येथे वनाधिकार क्षेत्रावर वृक्ष लागवड

बालाघाट येथे वनाधिकार क्षेत्रावर वृक्ष लागवड

मोलगी Molagi । वार्ताहर-

मानवी जीवनाचा (human life) महत्वाचा आधारभूत नैसर्गिक घटक (natural ingredients) म्हणजे झाडे असून त्याचे महत्व आज लोकांना लक्षात आले आहे. मानवाला जंगलतोडीचे दुष्परिणामही (Effects of deforestation) चांगले भोगावे लागत आहे. म्हणून अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाण ग्रामपंचायतीमधील बालाघाट (Balaghat) येथील गावकर्‍यांना मिळालेल्या 591 हेक्टर सामुहिक वनधिकार क्षेत्रावर सामूहिक (collective forest rights area) श्रमदानातून वृक्षलागवड (Plantation of trees) करण्यात आली.

बालाघाट येथील लोकांनी गावाला मिळालेल्या 591 हेक्टर सामूहिक वनाधिकार क्षेत्रावर गावकर्‍यांनी अभ्यास करून आपल्या परिसरातील कमी झालेल्या वृक्षांची परत लागवड व संवर्धन व्हावे म्हणून नवीन झाडाची लागवड केली जावी, गावात पाण्याचा मुबलक साठा वाढावा, नैसर्गिक धनसंपदा वाढीसाठी, बालाघाट येथील वनव्यवस्थापन समितीने नियोजन केले असून गावांतील शेतकरी व गावकर्‍यांच्या सहभागाने बालाघाट येथील डोंगरांवर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. त्यात खैर, बांबू, साग, आंबे याची लागवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी रिड्स पुण, मोलगी परिसर सेवा समितीचे मार्गदर्शन लाभले.

बिजरीगव्हाण ग्रामपंचायत सरपंच रोशन पाडवी, कालुसिंग वसावे, गावांतील नागरिक, नाशिक येथून जुई पेठे, कात्री परिसरातील संदिप वळवी, कंजाला येथून रामसिंग वळवी, सागर वळवी, मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी, संकेत वसावे, रवि तडवी, किसन वसावे आदींचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com