नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे २५ हजार वृक्षांची लागवड

जिल्हयात ७५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे २५ हजार वृक्षांची लागवड

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Nandurbar District Police Force) नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ७५ हजार (Tree planting) वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात २५ हजार वृक्षारोपण पूर्ण झाले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय येथे (Nashik area) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील (Dr. BG Shekhar Patil) यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.

सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये व निसर्गाचे संरक्षण व्हावे यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ७५ हजार वृक्षारोपण करण्याचे लक्ष असून यातील पहिला टप्पा म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील १२ पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय तसेच शाळा/महाविद्यालयाच्या आवारात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत २५ हजार वृक्ष लागवड केलेली आहे.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी पावेतो ७५ हजार वृक्षलागवड नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे लावण्यात येणारी ७५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आली असून त्यांचे योग्य प्रकारे नियोजन व आखणी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत, शाळा/महाविद्यालय, शासकीय पडीक जागेवर व इतर ठिकाणी सदरचे वृक्षारोपण करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज लावून हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड तसेच वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com