काळंबा फाटयावर पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक

दोन युवकांचा जागीच मृत्यू
काळंबा फाटयावर पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर काळंबा फाट्यावर महावितरण कंपनीच्या पिकअप व दुचाकीमध्ये भीषण अपघात होवून दोन जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार-खांडबारा रस्त्यावरील काळंबा फाट्याजवळ महावितरण कंपनीचे पिकअप वाहन आणि दुचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील दोन्ही तरुण रस्त्यावरून लांब शेतामध्ये फेकले गेले. यात एका तरुणाच्या हाताचे दोन तुकडे झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. महावितरण कंपनीचे पिकअप वाहन डीपी घेऊन जात असताना समोरून येणार्‍या मोटारसायकलीबरोबर समोरासमोर भीषण अपघात झाला.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून प्राथमिक माहितीनुसार राहुल केवजी नाईक (रा.मोगराणी ता.नवापूर) व दुसरा तरुण कोठली येथील रहिवासी महेश नावाचा आहे. दोन्ही मयतांचे मृतदेह जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.

पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची नातेवाईकांची मागणी

नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर काळंबा फाटयाजवळ २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नंदुरबारहुन मोगराणी येथे घरी जाणार्‍या दुचाकीवरील राहुल केवजी नाईक व महेश (रा.कोठली) यांना खांडबाराहून नंदुरबारकडे येणार्‍या विद्युत महावितरण कंपनीच्या पिकअप वाहनाचा एक्सेल तुटून अनियंत्रित झाल्याने समोरून येणार्‍या दुचाकीस्वारांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

सदर अपघाताबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून विद्युत महावितरण कंपनीच्या पिकअप वाहनाच्या चुकीमुळे दोन तरुणांचा जीव गेला असून पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com