#Photos # गहू दयस बाजरी दयस, याद माले माहेर नी यस

युवारंग मध्ये खान्देशी अहिराणी गीताला रसिकांनी दिली दाद ,भारतीय समूहगीतांनी रसिकांचे लक्ष वेधले
#Photos # गहू दयस बाजरी दयस, याद माले माहेर नी यस

शहादा sahada।

युवारंग (Yuvarang) युवक महोत्सवाचा ( Youth Festival) गुरुवारचा दिवस भारतीय समूहगीतांवर (Indian Group On songs) विविध कलाप्रकारांनी गाजला. एकसारखा भगवा रंगाचा फेटा बांधत विद्यार्थीनीनी भारतीय समूहगीत सादर केले आणि रसिकांचे (Fans) लक्ष वेधले.

गहू दयस बाजरी दयस, याद माले माहेर नी यस, माय भूमी , जन्म भूमी, कर्म भूमी आमची, त्याचबरोबर खंडोबाच्या कारभारीला बानुबाई धनगरीला या खान्देशी अहिराणी गीताला रसिकांनी दाद देत एकच जल्लोष केला होता हा कलाप्रकार ज्या सभागृहात सादर झाला तेथे खान्देशातील शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी होती. उपस्थित रसिकांनी टाळ्या चा गजरात या कलाप्रकाराला दाद दिली. या भारतीय समूह गीताला एकुण २० संघांनी सहभाग नोदविला होता

रंगमंच क्रमांक 4

शास्त्रीय गायन

नयनन मे आन बान...

मधूबन राधिका नाचे रे...

सूर ताल यांच्या जोर आणि त्यात तबला पेटीची साथ अशा पद्धतीने रंगमंच क्रमांक 4 वीर भगतसिंग ला रसिकांचे लक्ष वेधले. यामध्ये एकूण 9 स्पर्धक होते. शास्त्रीय गायन ऐकण्यासाठी रसिकांची रंगमंचावर गर्दी होती. सा रे ग म प ध नी सा ह्या सप्तकात स्पर्धकांनी प्रस्तुती देत रसिकांचे मन जिंकले. तान, राग यांनी बांधलेल्या शास्त्रीय गायन गायले.

रंगमंच क्रमांक तीन हुतात्मा लालदास

ऑनलाइन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे या विषयावर आधारित रंगमंच क्रमांक तीन हुतात्मा लालदास शाह येथे वादविवाद स्पर्धेमध्ये एकूण 57 स्पर्धकांपैकी 51 स्पर्धकांचा सहभाग होता यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे यावर जोरदार चर्चा करून त्या विषयावर माहिती दिली माणसाला जर का व्यक्तिमत्व विकासाची गरज असेल ते फक्त समोरासमोर आणि प्रत्यक्ष असल्यामुळेच भेटते परंतु ऑनलाईन असल्याने शिक्षण पद्धती ही दुरुस्त होत चालले आहे ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा नुकसान होत असून त्यांच्यामधले संवाद देखील होत नाही. ऑनलाइन मुळे दिवसेंदिवस मोबाईलच्या मोठ्या प्रमाणात वापर होत असून विद्यार्थी शिक्षणाऐवजी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जास्त ॲक्टिव असताना दिसतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे

विद्याश्रम परिसरात आयोजित युवक महोत्सव युवारंग 2021 च्या तिसऱ्या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेला युवारंग महोत्सव उन्हाळ्याच्या वेळेस सुरू असताना कडाक्याचे ऊन हे 40 डिग्री तापमानात आपले आपले कला कलावंत सादर करीत आहेत, पावसाच्या हलक्या सरी चे आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये युवारंगचा अजून उत्साह निर्माण झाला असून विद्यार्थी पावसाचा आनंद घेत आहेत व सोबत युवारंगचा ही आनंद घेत आहेत

Related Stories

No stories found.