सातपुडयातील गिर्यारोहक अनिल वसावे याची पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी

हिमालयातील २३ हजार फुट उंच माऊंट सतोपंथ शिखर केले सर
सातपुडयातील गिर्यारोहक अनिल वसावे याची पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

सातपुडयातील (Satpura Mountains) अतिदुर्गम भागातील बालाघाट ता.अक्कलकुवा (Akkalkuva) येथील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक (Mountaineer) अनिल वसावे याने हिमालयातील माउंट सतोपंथ हे ७०७५ मीटर अर्थात २३ हजार २१२ फूट उंचीचे शिखर सर केले. १७ हजार फूट उंचीवर त्याने तिरंगा फडकवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे याने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करून विश्वविक्रम केला होता.

कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता. अनिल वसावे यांनी २०२१ मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम होती.

२६ जानेवारी २०२१ रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलोमांजरो हे शिखर सर केले होते. येणार्‍या काळात सातही खंडातील ७ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याचा मानस आहे.

माऊंट सतोपंथ हे हिमालयाच्या गढवाल श्रेणीतील प्रमुख शिखरांपैकी एक आहे. ते भारतीय उपखंडात येते आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. हे ७ हजार ७५ मीटर शिखर अनिल वसावे याने काल दि.२३ रोजी सर केले. ही मोहिम दि .

१० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२२ अशी असून हे शिखर सर करण्यासाठी त्यांनी ७०७५ मीटर म्हणजे जवळ जवळ २३ हजार २१२ फूट एवढया उंच असलेल्या माउंट सतोपंथ या शिखरावर खराब हवामान असतानाही सर केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अशी विशेष कामगिरी करून आजादी का अमृत महोस्तव ही मोहीम आखली आहे. विशेष म्हणजे अनिल वसावे पहिल्यांदा एवढा उंच शिखर सर करण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांना प्रचंड मोठी मेहनत करावी लागली. या मोहिमेसाठी नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com