एस.टी.बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने 57 वर्षीय प्रवाश्याचा मृत्यू

एस.टी.बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने 57 वर्षीय  प्रवाश्याचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

सुरतहुन (surat) प्रवाशांना घेऊन निघालेल्या (jamner) जामनेर सुरत चालत्या (s t bus) बस मध्ये नवापूर ते विसरवाडी (Navapur to Visarwadi) दरम्यान एका 57 वर्षीय प्रवाश्याला अस्वस्थ वाटत असल्याने चालक वाहक व सहप्रवाशांनी राष्ट्रीय महामार्गावर जवळील विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात सदर व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले.

विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर व्यक्तीला नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले; दरम्यान विसरवाडीहुन नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जातांना (Ambulance) रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

रोहिदास श्यामराव पाटील असे या व्यक्तीचे नाव असून (Surat Municipal Corporation) सुरत महानगरपालिका अग्निशमन दलात (Fire brigade) फायरमन पदावर काम करत असल्याचे ओळखपत्रामुळे माहीती मिळाली.

ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नातेवाईकांकडे वर्षश्राद्ध असल्याने जात असताना त्यांना बस मध्ये हृदयविकाराचा झटका आला रोहीदास पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (pachora) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांना मोबाईल फोनद्वारे कळविण्यात आले आहे.

सुरत जामनेर चालत्या एसटी बसमध्ये नवापूर ते विसरवाडी दरम्यान सदर व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले अवस्थेत खाली पडल्यानंतर सहप्रवाशांनी चालक-वाहकला सांगून सदर प्रवाशाची स्थिती लक्षात आणून दिली त्यानंतर चालक वाहकाने लगेच बस थांबवून उपचारासाठी दाखल केले. मात्र सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन जात असताना रस्त्यात दगावल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळविण्यात आले आहे. सदर व्यक्तीला प्रवासादरम्यान चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com