सावरट येथील बायोडिझेल पंपाचे सिल काढण्याचे आदेश

एस एन ६० ऑईलची विक्री होत असल्याचा निर्वाळा
सावरट येथील बायोडिझेल पंपाचे सिल काढण्याचे आदेश

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नवीन सावरट (ता.नवापूर) येथील पलक बायोडिझेल अँड केमिकल्स या पंपावर अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत नसून एस एन ६० या ऑईलची विक्री करण्यात येत असल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सदर बायोडिझेल पंपाला लावण्यात आलेले सील काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नवीन सावरट (ता.नवापूर) येथील पलक बायोडिझेल अँड केमिकल्स या पंपावर अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याने नंदुरबारच्या सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांनी सदर बायोडिझेल पंपाला दि.२० सप्टेंबर २०२१ रोजी सील केले होते.

ही कारवाई पुरवठा विभाग व जिल्हा प्रतिनिधी भारत पेट्रोलियम मनमाड यांच्या संयुक्त पथकाने २० सप्टेंबरला केली होती. विक्री करण्यात येत असलेल्या ऑईलचे नमुने घेण्यात आले होते. तपासणीसाठी नमूने पाठविण्यात आले होते.

या कारवाईच्या आदेशाविरुद्ध पलक बायोडिझेल अँड केमिकलने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होवून या पंपावर अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत नसून एसएन ६० या ऑईलची विक्री करण्यात येत असल्याने खंडपीठाने सील काढण्याचा निकाल दिला आहे.

पलक पंपावर बायोडिझेलची विक्री होत नसून एस एन ६० या ऑईलची विक्री औद्योगिक कारखान्यांना करण्यात येते. सदर ऑईल विक्रीबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाहीत. पलक बायोडिझेल या पंपावर एस एन ६० या ऑईलची विक्री सुरू होती.

या ऑईलचा वापर औद्योगिक कारखान्यात होतो. त्यामुळे सहायक जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पंपाला २० सप्टेंबरला लावलेले सील काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसे पत्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी १२ नोव्हेंबरला दिले.

खंडपीठाने दिलेल्या आदेशाची पीडिएफ फाईल मिळाली आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार पलक बायोडिझेल अँड केमिकल या पंपाचे सील काढण्याची कारवाई करण्यात येईल.

- मंदार कुलकर्णी, तहसीलदार

पलक बायोडिझेल अँड केमिकलआमच्या पंपावर एस एन ६० या ऑईलची विक्री सुरू होती. या ऑईलचा वापर औद्योगिक कारखान्यात होतो. बायोडिझेल विक्री परवानाकामी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.

- मनिष अग्रवाल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com